Navardev Bsc Agri (2024): शेतकऱ्यांच्या जीवनावर चित्रपट

नवीन चित्रपट Navardev Bsc Agri (2024) तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात येत आहे. हा चित्रपट एका शेतकऱ्याच्या जीवनावर आधारित आहे जो Bsc. Agri पदवीधर आहे.

हा चित्रपट एका तरुण बीएससी कृषी पदवीधर शेतकरी राजवर्धनवर आधारित आहे. जेव्हा तो त्याचे शिक्षण संपवून गावी शेती करण्यासाठी परत येतो आणि आपण शिकलेले सर्व गोष्टी स्वतःबरोबर आपल्या गावीकरी सांगून त्यांचे उत्पन्न वाटवण्यात मदत करतो पण त्याच बरोबर जेव्हा तो लग्न करण्यासाठी मुलगी पाहायला जातो तेव्हा त्याला नकार मिळतो कारण तो एक शेतकरी आहे ह्या कारणासाठी, हा आहे छोटासा सारांश ह्या चित्रपटाचा.

कलाकार कोण आहेत?

प्रमुख कलाकार: क्षितिज दाते

हा धर्मवीर आणि मुळशी पॅटर्न या चित्रपटांमधील असामान्य अभिनयासाठी ओळखला जातो. तसेच त्यांनी विविध टीव्ही मालिकांमध्येही काम केले आहे.

इतर कलाकार:

  • मकरंद अनासपुरे
  • प्रविण तरडे
  • प्रियदर्शिनी इंदलकर
  • हार्दिक जोशी
  • गार्गी फुले
  • संदीप पाठक
  • तानाजी गलगुंडे

दिग्दर्शक कोण आहे?

हा चित्रपट राम खाटमोडे यांनी दिग्दर्शित केला आहे. दिग्दर्शक म्हणून हा त्यांचा पहिलाच चित्रपट असावा आणि ते मुळशी पॅटर्न, सरला एक कोटी, देऊळ बंद इ. या चित्रपटाचे सहाय्यक दिग्दर्शक होते. हा चित्रपट दिग्दर्शक म्हणून त्यांचे पहिले पदार्पण असेल.

चित्रपट कधी प्रदर्शित होतोय?

काही अहवालानुसार हा चित्रपट २६ जानेवारी २०२४ रोजी प्रदर्शित होणार आहे. चित्रपटांचे आगाऊ बुकिंग अद्याप उघडलेले नाही परंतु ते चित्रपट रिलीजच्या किमान एक आठवड्यापूर्वी उघडतील असा अंदाज आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *