मुकेश अंबानी Decathlon ला टक्कर देणारा नवीन स्पोर्ट्स ब्रँड बाजारात आणणार?

मुकेश अंबानी भारतातील क्रीडा सामान क्षेत्रातील आघाडीच्या कंपनी असलेल्या Decathlon ला टक्कर देण्यासाठी एक नवीन स्वदेशी स्पोर्ट्स ब्रँड लाँच करण्याच्या तयारीत आहे. या नवीन ब्रँडसाठी देशातील प्रमुख शहरांमधील निवडक ठिकाणांवर 8000 ते 10000 चौ. फूट इतक्या मोठ्या क्षेत्रफळाची जागा भाडेतत्त्वावर घेण्याची चर्चा सुरु आहे.

भारतात क्रिकेट ही सर्वोत्तम क्रीडा असला तरी, गेल्या काही वर्षात इतर क्रीडा प्रकारांमध्येही लोकांची मोठी वाढ झालेली आहे. फुटबॉल, बॅडमिंटन, टेनिस, जिमिंग उपकरण अशा विविध क्रीडा आणि व्यायामाशी संबंधित वस्तूंची मागणी वाढत आहे. या वाढत्या मागणीची गरज लक्षात घेऊन रिलायन्स रिटेलने क्रीडा क्षेत्रात पदार्पण करण्याचा निर्णय घेतला असल्याचे सांगितले जात आहे. रिलायन्स रिटेलचा देशभर व्यापक जाळा आणि मोठा ग्राहकवर्ग याचा फायदा या नवीन ब्रँडला मिळू शकतो.

फ्रेंच स्पोर्ट्स सामान क्षेत्रातील आघाडीची कंपनी Decathlon भारतात 2009 पासून कार्यरत आहे. Decathlonने अगदी कमी किमतीत, चांगल्या दर्जाची आणि टिकाऊ क्रीडा सामग्री पुरवून भारतीय बाजारपेठेत आपले स्थान निर्माण केले आहे. आजच्या घडीला भारतात Decathlonच्या 100 पेक्षा जास्त दुकाने आहेत. रिलायन्स रिटेल Decathlonच्या यशस्वी व्यवसाय मॉडेलवर आधारित स्वदेशी ब्रँड आणून Decathlonला थेट टक्कर देण्याच्या तयारीत असल्याची शक्यता आहे. रिलायन्स रिटेल कोणत्या नावाने आणि कशा पद्धतीने भारतातील क्रीडा सामान बाजारपेठेत प्रवेश करणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

देशातील क्रीडाप्रेमींना आता आंतरराष्ट्रीय दर्जाची, परंतु स्वदेशात बनवलेली क्रीडा सामग्री मिळण्याची मोठी संधी मिळणार आहे. यामुळे आयात कमी होऊन भारतातील क्रीडा उत्पादनांचे उत्पादन आणि विक्री यात वाढ होण्याची शक्यता आहे. तसेच, स्पर्धात्मक बाजारपेठेत अधिक पर्याय उपलब्ध होणे हे ग्राहकांसाठी फायदेशीर ठरेल.

मुकेश अंबानी कोणत्या किंमतीच्या रेंजमध्ये उत्पादने उपलब्ध करून देणार? त्यांच्या उत्पादनांची गुणवत्ता कशी असेल? यावर अवलंबून त्यांच्या या नवीन उपक्रमाचा भारतीय बाजारपेठेवर काय परिणाम होईल हे निश्चित होईल. तसेच, Decathlon या नवीन आव्हनाला कसे सामोरे जाणार? आपल्या मॉडेलमध्ये बदल करणार का? याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे. रिलायन्स रिटेल आणि Decathlon या दोन दिग्गजांमधला हा सामना क्रीडाप्रेमींसाठी निश्चितच फायद्याचा ठरेल. ग्राहकांना अधिक चांगल्या किमतीत आणि दर्जेदार क्रीडा सामग्री मिळण्याची शक्यता वाढणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *