Free Education For Girls: महाराष्ट्राचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी एका सभेत असे सांगितले आहे की, कोणत्याही मुलीचे कौटुंबिक उत्पन्न ८ लाखा पेक्षा कमी आहे त्या मुलींना उच्च शिक्षण मोफत केले आहे। ह्या योजने अंतर्गत ६०० वेगवेगळे अभ्यासक्रम घेण्यात येणार आहेत त्यामध्ये इंजिनीरिंग, मेडिकल इत्यादी अभ्यासक्रम सामाविस्ट आहेत। अशी घोषणा शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी केली आहे।
Table of Contents
Free Education For Girls: कोणासाठी असेल ही योजना ?
महाराष्ट्राचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या कार्यक्रमात ह्या योजनेची घोषणा केली आणि ती घोषणा अशी आहे की ज्या मुलीचे कौटुंबिक वार्षिक उत्त्पन्न हे ८ लाखाच्या खाली आहे त्यांना ह्या योजनेचा लाभ घेता येईल आणि ह्या सर्व मुलींचे शिक्षणाचा खर्च हे सरकार उचलणार आहे।
ज्या मुलींना इंजिनीरिंग शिकायचे आहे पण त्या शिकू शकत नाहीत कारण इंजिनेरींग फी ही लाखात जाऊ शकते आणि ज्यांना मेडिकल मध्ये शिकायचे आहे त्यांची फी तर कोटींमध्ये असते। अश्या ह्या गरजू मुलींना आणि मुलींना शिक्षणात आणखी प्रोत्सान मिळण्यासाठी ही योजना चालू करण्यात आली आहे असे शिक्षण मंत्री यांनी सांगितले आहे।
सध्या याच श्रेणीमध्ये ५० टक्के शैक्षणिक फी माफी आहे जी आता १०० टक्के करण्यात आली आहे। चंद्रकांत पाटील म्हणाले, “विविध क्षेत्रांतील उच्च शिक्षण अभ्यासक्रमांना अधिकाधिक मुलींनी प्रवेश घ्यावा, यासाठी विद्यापीठांनी काम केले पाहिजे,” कुलगुरूंना यासाठी विशेष मोहीम चालवण्याच्या सूचना सुद्धा दिल्या आहेत आणि विद्यापीठांनी वेळेवर निकाल जाहीर करण्यावरही जोर ह्या सभेत त्यांनी दिला।
Free Education For Girls: कधी पासून लागू होणार ही योजना?
मुलींसाठी मोफत उच्च शिक्षणाची योजना ही ह्या जून पासून म्हणजेज जून २०२४ पासून लागू होणार आहे। वरील सांगितल्या प्रमाणे ह्या योजने अंतर्गत एकूण ६०० वेगवेगळे अभ्यासक्रम असणार आहेत त्यापैकी, इंजिनीरिंग, मेडिकल, कला, वाणिज्य इत्यादी अभ्यासक्रम असणार आहेत।
मुलांसाठी काय ? असे प्रश्न तिथे बसलेल्या मुलांनी विचारला तर, शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी असे सांगितले आहे की “ही योजना फक्त मुलींसाठी आहे आणि मुलांच्या बाबत अजून कोणताही विचार केलेला नाही” असे ते म्हणाले।
ज्या मुलींची आर्थिक बाजू कमकुवत आहे त्यांच्यासाठी ही एक फार मोठी बाब आहे। ह्या योजनेमुळे मुलींना आपले शिक्षण चालू ठेवण्यात कोणतीही अडचण येणार नाही आणि मुलींना पुढे शिकण्यासाठी प्रोत्सान देखील मिळेल। पुढे जाऊन ह्याच मुली आपला स्वत्रंत व्यवसाय सुद्धा चालू करू शकतात आणि आपल्या देशाला पुढे नेऊ शकतात।