हिंदी सिनेसृष्टीतील सर्वाधिक प्रतीक्षित चित्रपटांपैकी एक असलेल्या ‘जॉली एलएलबी ३’ च्या चित्रीकरणाला अखेर सुरुवात झाली आहे. हे वृत्त चाहत्यांसाठी नक्कीच आनंददायक आहे. या चित्रपटातून प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी पुन्हा एकदा धडाकेदार कोर्टरुम ड्रामा पाहायला मिळणार आहे.
या चित्रपटाचे दिग्दर्शन सुभाष कपूर करत आहेत. ‘जॉली एलएलबी’ या पहिल्या चित्रपटात मुख्य भूमिका साकारणार्या अर्शद वारसी यांच्यासोबत यावेळी अक्षय कुमार प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. याशिवाय सौरभ शुक्ला हे देखील या चित्रपटात प्रमूख भूमिकेत असणार आहेत.
अक्षय कुमार यांनी नुकताच प्रदर्शित केलेला एक व्हिडिओ प्रेक्षकांच्या उत्सुकतेला भर पाडतो आहे. या व्हिडिओमध्ये अक्षय आणि अर्शद दोघेही स्वतःला “खरा जॉली” असल्याचे सांगताना दिसतात. यावरून चित्रपटात या दोघांमध्ये कोर्टरुममध्ये लढाई पाहायला मिळण्याची शक्यता आहे.
Ab original kaun aur duplicate kaun, yeh toh pata nahi. But this sure is going to be a jolly good ride !! Stay with me. Jai Mahakaal 😊🙏 #JollyLLB3 pic.twitter.com/wjGnc0XmDF
— Akshay Kumar (@akshaykumar) May 2, 2024
२९ एप्रिल २०२४ रोजी राजस्थानच्या अजमेर येथे या चित्रपटाच्या चित्रीकरणाला क्लॅप दिला गेला आहे. सूत्रांनुसार, अर्शद वारसी यांनी सर्वप्रथम चित्रीकरणाची सुरुवात केली असून २ मे रोजी अक्षय कुमार यांचा सहभाग सुरू झाला आहे. याआधी प्रदर्शित झालेल्या ‘जॉली एलएलबी’ आणि ‘जॉली एलएलबी २’ या चित्रपटांच्या यशानंतर आता अक्षय कुमार आणि अर्शद वारसी यांची ही धमाकेदार जोडी पुन्हा एकदा प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज आहे. त्यामुळे या चित्रपटाची प्रतीक्षा प्रेक्षकांमध्ये चांगलीच आहे.
‘जॉली एलएलबी ३’ चा निर्माते कोण आहे आणि चित्रपट कधी प्रदर्शित होणार याबाबत अद्याप कोणतीही घोषणा झालेली नाही. परंतु, चित्रीकरण आता सुरू झाल्यामुळे २०२५ च्या अखेरपर्यंत हा चित्रपट प्रदर्शित होण्याची शक्यता आहे.