Site icon बातम्या Now

Ayodhya Ram Mandir: नवीन राम मंदिर कसे असेल?

Ayodhya Ram Mandir: अयोध्येतील श्री रामजन्मभूमी मंदिराचे उद्घाटन 22 जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे आणि मंदिर २४ जानेवारीपासून भाविकांसाठी खुले होणार आहे.

Ayodhya Ram Mandir: मंदिर कसे बांधले आहे?

मंदिर पारंपारिक नगर शैलीत आहे. मंदिराची लांबी (पूर्व-पश्चिम) 380 फूट, रुंदी 250 फूट आणि उंची 161 फूट आहे. मंदिर तीन मजली असून प्रत्येक मजला 20 फूट उंच आहे. यात एकूण 392 खांब आणि 44 दरवाजे आहेत. मंदिराच्या पायासाठी 70 फूट खाली खोदले आहे. 1000 वर्षे मंदिराला काहीही होणार नाही असे मंदिराच्या ठेकेदारांकडून आश्वासन देण्यात आले आहे.

मुख्य गर्भगृहात भगवान श्री राम (श्री राम लल्लाची मूर्ती) चे बालपणीचे रूप आहे आणि पहिल्या मजल्यावर श्री रामाचे दरबारआहे.

श्री राम जन्मभूमी मंदिर परिसर

मंदिरात पाच मंडप असतील :

वेगवेगळे मंदिरे

कंपाऊंडच्या चार कोपऱ्यांवर, चार मंदिरे आहेत – सूर्यदेव, देवी भगवती, गणेश भगवान आणि भगवान शिव यांना समर्पित. उत्तरेकडे माँ अन्नपूर्णेचे मंदिर आणि दक्षिणेकडे हनुमानजींचे मंदिर आहे. मंदिराजवळ एक ऐतिहासिक विहीर (सीताकूप) आहे, जी प्राचीन काळातील आहे. श्री रामजन्मभूमी मंदिर संकुलात, महर्षी वाल्मिकी, महर्षी वशिष्ठ, महर्षी विश्वामित्र, महर्षी अगस्त्य, निषाद राज, माता शबरी. संकुलाच्या नैऋत्य भागात, कुबेर टिळा येथे, जटायूच्या स्थापनेसह भगवान शिवाच्या प्राचीन मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला आहे.

मंदिर बाधण्यासाठी काय वापरले आहे.

मंदिर बाधण्यासाठी कोणत्याही लोकांडाचे वापर केलेला नाही. मंदिराचा पाया 14-मीटर-जाड रोलर-कॉम्पॅक्टेड काँक्रीट (RpCC) च्या थराने बांधण्यात आला आहे, ज्यामुळे त्याला कृत्रिम खडकाचे स्वरूप प्राप्त झाले आहे. जमिनीतील ओलाव्यापासून संरक्षणासाठी ग्रॅनाइटचा वापर करून २१ फूट उंचीचा प्लिंथ बांधण्यात आला आहे.

भारताचे पारंपारिक आणि स्वदेशी तंत्रज्ञान.

हे मंदिर संपूर्णपणे भारताच्या पारंपारिक आणि स्वदेशी तंत्रज्ञानाचा वापर करून तयार केले आहे. 70 एकर क्षेत्रापैकी 70% क्षेत्र हिरवेगार ठेवून पर्यावरण-जलसंवर्धनावर विशेष भर देऊन हे बांधले जात आहे.

Exit mobile version