BJP Election Manifesto 2024 : प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी समवेत भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष श्री जे.पी.नड्डा, केंद्रीय गृह आणि सहकारिता मंत्री श्री अमित शाह, रक्षा मंत्री श्री राजनाथसिंग आणि वित्त मंत्री श्रीमती सीतारामन यांनी 2024 चा भाजपचे जाहीरनाम्याचा सादरीकरण केले आणि हा जाहीरनामा संकल्प पत्र म्हणून ओळखला जाणार आहे. तर मग चला जाणून घेऊयात ह्या जाहीरनाम्यात कोण-कोणत्या गोष्टींचे आश्वासन दिले गेले आहे.
Table of Contents
BJP Election Manifesto 2024 : मोठ मोठया घोषणा
मुद्रा योजना में लोन की सीमा बढ़ाने के साथ-साथ स्वनिधि योजना का भी विस्तार किया जाएगा, इसे देश के छोटे कस्बों और गांव-देहात तक ले जाया जाएगा। pic.twitter.com/ilihwfx6xk
— Narendra Modi (@narendramodi) April 14, 2024
नारीशक्ति के लिए पिछले 10 वर्ष उनकी गरिमा और उन्हें नए अवसरों को समर्पित रहे हैं। आने वाले 5 वर्ष नारीशक्ति की नई भागीदारी के होंगे। pic.twitter.com/9gb6oDZ1xR
— Narendra Modi (@narendramodi) April 14, 2024
भाजपा का संकल्प भारत को फूड प्रोसेसिंग हब बनाने का है। इससे वैल्यू एडिशन तो होगा ही, किसान का फायदा बढ़ेगा और रोजगार के नए अवसर भी बनेंगे। pic.twitter.com/z2FvlFdahq
— Narendra Modi (@narendramodi) April 14, 2024
भाजपा का संकल्प पत्र युवाशक्ति, नारीशक्ति, किसान और गरीब को समर्पित है। इन्हीं संकल्पों को लेकर मध्य प्रदेश के होशंगाबाद में अपनों के बीच आकर गर्व महसूस कर रहा हूं।https://t.co/sBRvBmpkPp
— Narendra Modi (@narendramodi) April 14, 2024
BJP Election Manifesto 2024 : काही घोषणांबद्दल थोडक्यात माहिती
मोफत रेशन योजना:
- मोफत रेशन योजना पुढील 5 वर्षे चालू राहणार.
- गरिबांना दिले जाणारे अन्न पौष्टिक, समाधानकारक आणि परवडणारे असेल.
आरोग्य योजना:
- 70 वर्षांवरील प्रत्येक वृद्ध व्यक्तीला आयुष्मान योजनेमध्ये समाविष्ट केले जाईल.
- 70 वर्षांवरील प्रत्येक वृद्ध व्यक्तीला, गरीब, मध्यमवर्गीय किंवा उच्च मध्यमवर्गीय असो, ₹5 लाखांपर्यंत मोफत उपचार सुविधा मिळतील.
इतर योजना:
- गरिबांसाठी आणखी 3 कोटी घरे बांधली जातील.
- मुद्रा योजनेची व्याप्ती ₹20 लाखांपर्यंत वाढवली जाईल.
- तृतीयपंथी समुदायाला आयुष्यमान भारत योजनेचा लाभ मिळेल.
- गुंतवणुकीद्वारे जीवनमान, जीवनाचा दर्जा आणि रोजगार निर्मितीवर भर दिला जाईल.
- घराघरात पाईपलाईनद्वारे गॅस पुरवठा केला जाईल.
- पीएम किसान योजनेचा लाभ पुढेही 10 कोटी शेतकऱ्यांना मिळेल.
- सहकारात्मक दृष्टिकोनातून समृद्धीसाठी, भाजप राष्ट्रीय सहकार धोरण आणेल.
- देशभरातील दुग्धव्यवसाय आणि सहकारी संस्थांची संख्या वाढवली जाईल.
- पंतप्रधान आवास योजनेत आता दिव्यांगांना प्राधान्य दिले जाईल.
- जेनेरिक औषधांची केंद्रं आणखी वाढवली जातील.
- उज्ज्वला योजनेची सबसिडी पुढील एका वर्षासाठी वाढवली जाईल.
- महिला खेळाडूंना विशेष सुविधा दिल्या जातील.
- कोट्यवधी लोकांची वीज बिले रद्द करण्यावर भर दिला जाईल.
- कृषी क्षेत्रावर विशेष लक्ष केंद्रित केले जाईल आणि देशाची अन्न प्रक्रिया केंद्र बनवली जाईल.
- महिला सक्षमीकरणाला प्राधान्य दिले जाईल.
- 3 कोटी महिलांना लखपती बनवले जाईल आणि महिलांना IT आणि पर्यटनाकडे वळवले जाईल.
- मुद्रा योजनेअंतर्गत ₹10 लाखांवरून ₹20 लाखांपर्यंत कर्ज दिले जाईल.
BJP Election Manifesto 2024 : निष्कर्ष
या जाहीरनाम्यामध्ये गरीब, वंचित आणि शेतकऱ्यांसाठी अनेक महत्त्वाच्या योजनांचा समावेश आहे. ३ कोटी नवीन घरे बांधून गरिबांना पक्के निवारा मिळेल. मुद्रा योजनेची व्याप्ती वाढवून आणि ३ कोटी महिलांना सक्षम बनवून रोजगार निर्मिती आणि आर्थिक सक्षमीकरणाला चालना मिळेल. तृतीयपंथी नागरिकांना आयुष्यमान भारत योजनेचा लाभ देऊन आणि पीएम किसान योजनेचा लाभ वाढवून त्यांच्या कल्याणाची काळजी घेण्यात आली आहे. ऊर्जा क्षेत्रात, घराघरात गॅस पुरवठा आणि उज्ज्वला योजनेची सबसिडी वाढवून गरिब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांना दिलासा मिळेल. आरोग्य सुविधांमध्ये सुधारणा करण्यासाठी जेनेरिक औषधांची केंद्रं वाढवली जातील. याव्यतिरिक्त, महिला खेळाडूंसाठी विशेष सुविधा आणि कोट्यवधी लोकांची वीज बिले रद्द करण्याची योजना गरीब आणि गरजू लोकांना मदत करेल. कृषी क्षेत्रावर विशेष लक्ष केंद्रित करून आणि देशाला अन्न प्रक्रिया केंद्र बनवण्याचा प्रयत्न करून शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करण्याचा प्रयत्न केला जाईल.
एकंदरीत, हा जाहीरनामा समावेशक आणि विकासाला चालना देणारे वाटत आहे, पण दरवेळी प्रमाणे ह्या वेळी सुद्धा जाहीरनाम्यात दिलेल्या गोष्टींची अंबालबजवानी झाली पाहिजे, नाहीतर हे जाहीरनामे सुद्धा काही काळानंतर विसरून जातील आणि पुन्हा सर्वसामानाच्या हाती फक्त नैराश्य लागेल। जर जाहीरनाम्यात सांगितलेल्या सर्व गोष्टी झाल्या तर समाजातील सर्व घटकांना फायदा होण्याची अपेक्षा आहे.