Site icon बातम्या Now

Chandan : तब्बल १०० कोटीचे हे कोंकणातील झाड

chandan

मित्रानो तुम्हाला माहिती तर असेल चंदन(Chandan) हे झाड किती अलौकिक आणि किती दुर्मिळ आहे. तुम्ही कधी ना कधी तर ऐकले असेल चंदन तस्करी बदल जे रोज बातमीपत्रात वारंवार येत असतात आणि चंदनाचा सुगंध किती अप्रतिम आणि मनमोहक असतो ते पण ह्या असल्या चंदनाच्या एक ग्रामसाठी खूप किंमत सुद्धा मुजावी लागते हे पण तितकेच खरे आहे.

कुठे आहे हे चंदनाचे(Chandan) झाड?

हे चंदनाचे झाड रत्नागिरी जिल्हा येतील संगमेश्वर तालुख्यातील चाफवली या गावामध्ये आहे आणि हे तब्बल १५० वर्षाहून अधिक जुने असल्याचे सांगण्यात आले आहे आणि हो जर आपण ह्याची चोरी करण्याचे मनात असाल तर कृपया हा विचार मनातून कडून टाका कारण ह्या झाडाला २४ तास सुरक्षा गावातील लोक तर देतात पण तसेच पोलीस सुद्धा.

ह्या झाडाला एव्हडी किंमत का?

पहिल्यांदा ह्या झाडाबद्दल अधिक माहिती घेऊयात, ह्या झाडाला रक्तचंदन असे म्हणतात आणि हे झाड मुळात कोकणात सापडत नाही कारण हे तामिळनाडू आणि आंध्रप्रदेशमधील चित्तुर, कडप्पा, कुरनुल आणि नेल्लोर ह्या चार जिल्ह्यांमध्ये आढळतात आणि हे झाड चाफवली गावात कसे आले याचा गावकर्यांना काही सुद्धा अंदाजा नाहीय.

यायची किंमत एव्हडी का, जर तुम्ही अल्लू अर्जुनचा पुष्पा बघितला असेल तर तुम्हाला लक्षात येईल की तो ज्या झाडाची तस्करी करत असतो ते हेच झाड, ह्या झाडला इंग्रिजेमध्ये रेडसॅंडलवूड असे म्हणतात. ह्या झाडाची जपान, ऑस्ट्रेलिया, सिंगापूर येथे खूप मागणी आहे आणि ह्या कारणामुळे सुद्धा ह्या झाडची किंमत वाढती आहे.

तर १०० कोटी आकडा आला कसा ? मुळात हे झाड कोकणातले नसल्यामुळे ह्या झाडाला विशेष असे महत्व आले आहे आणि जेथे सध्या रक्तचंदनाची लाकूड किलो ५ ते ४ हजार ह्या दराने मिळते तिथे हे दुर्मिळ असे झाड कोकणात सापडल्यामुळे ह्याची किंमत वाढली आहे असे तेथील आधिकारयांचे म्हणणे आहे.

ह्याचे उपयोग कोणकोणते आहेत ?

हे झाड खूप वेगवेगळ्या कामासाठी वापरण्यात येते जसे की, मूर्तीबनवण्या करिता तसेच आयुर्वेदिक औषधे बनवण्याकरिता देखील याचा वापर होतो आणि बरेच काही.

हापूस बाजारात आला सुद्धा जाणून किंमत किती? येथे क्लिक करा

Exit mobile version