Site icon बातम्या Now

Filmfare Awards 2024: कोणी कोणते पुरस्कार जिंकले?

Filmfare Awards 2024

Filmfare Awards 2024: दरवर्षी प्रमाणे ह्या वर्षी सुद्धा Filmfare Awards चा कार्येक्रम पार पडला। ह्या वर्षीचा फिल्मफेर गुजरातच्या गिफ्ट सिटी मध्ये आयोजित केला होता आणि ह्याला स्पॉन्सर Hyundai यांनी केले होते। दरवर्षी प्रमाणे ह्यावर्षी सुद्धा खूप उत्तम उत्तम चित्रपट प्रदर्शित झाले होते जसे की १२ फैल, सॅम बहादूर, ऍनिमल, जवान इत्यादी। १२ फैल हा सर्वात लोकप्रिय आणि चर्चेत राहिलेला चित्रपट होता आणि ह्याच चित्रपटाने ह्या वर्षी बाजी मारली असे दिसून येत आहे।

चला मग जाणून घेऊयात कोणी कोणता पुरस्कार जिंकला आहे तो।

Filmfare Awards 2024: विजेते

सर्वोत्तम चित्रपट: 12TH FAIL

Credit: Times now

सत्य घटनेवर आधारित १२ फैल हा चित्रपट आयपीएस अधिकारी मनोज कुमार शर्मा आणि आयआरएस अधिकारी श्रद्धा जोशी यांच्या आयुष्यावर होता। हा चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तर चांगली कमाई केलीच पण अभिनेता विक्रांत मॅसी याच्या अभिनयामुळे हा चित्रपट खूप गाजला आणि लोकप्रिय झाला।

सर्वोत्तम दिग्दर्शक: विधू विनोद चोप्रा

Credit: IMDb

विधू विनोद चोप्रा यांना उत्कृष्ट दिग्दर्शकाचा अवॉर्ड मिळाला आहे।

सर्वोत्कृष्ट अभिनेता (पुरुष): रणबीर कपूर

रणबीर कपूर याला ऍनिमल ह्या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेताचा Filmfare Award मिळाला आहे।

सर्वोत्कृष्ट अभिनेता समीक्षक: विक्रांत मॅसी

समीक्षकांच्या मते Filmfare Awards २०२४ चा सर्वोत्कृष्ट अभिनेता विक्रांत मॅसी आहे।

सर्वोत्कृष्ट अभिनेता (महिला): आलिया भट

हा फिल्मफेर अवॉर्ड आलिया भट हिला तिझा चित्रपट रॉकी और रानी की प्रेम कहानी ह्यासाठी मिळाला आहे।

सर्वोत्कृष्ट अभिनेत्री समीक्षक

समीक्षकांच्या मते राणी मुखर्जी (CHATTERJEE VS. NORWAY) आणि शेफाली शाह (THREE OF US) यांना मिळाला आहे।

सहाय्यक भूमिकेतील सर्वोत्कृष्ट अभिनेता (पुरुष)

विकी कौशल याला सहायक भूमिकेतील उत्कृष्ट आभिनेताच अवॉर्ड मिळाला आहे।

सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक (पुरुष)

ऍनिमल ह्या चित्रपटातील अर्जन वाहीली ह्या गाण्यासाठी भूपिंदर बब्बल यांना हा पुरस्कार मिळाला आहे।

सर्वोत्कृष्ट प्लेबॅक सिंगर (महिला)

शिल्पा राव हिला पुरस्कार मिळाला आहे।

सर्वोत्तम कथा

OMG2 या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट कथेचा पुरस्कार मिळाला आहे।

सर्वोत्तम संगीत

ऍनिमल ह्या चित्रपटाला सर्वोत्तम संगीतचा अवॉर्ड मिळाला आहे।

सर्वोत्कृष्ट गीत

अमिताभ भट्टाचार्य तेरे वास्ते – जरा हटके जरा बचके ह्या चित्रपटासाठी मिळाला आहे।

Exit mobile version