नवीन Hp Spectre x360 लॅपटॉप भारतात झाला लॉन्च, जाणून घ्या किंमत आणि स्पेसिफिकेशन

Hp Spectre x360 HP चा प्रतिक्षित लॅपटॉप अखेर भारतात आला आहे। हा लॅपटॉप अगोदर अमेरिका ह्या देशात आला होता आणि HP ने हा लॅपटॉप भारतात सुद्धा लॉन्च केलेला आहे अशी माहिती HP कडून देण्यात आलेली आहे। ह्या लॅपटॉप मध्ये नवीन गोष्टींचा समावेश केलेला आहे जसे की Oled स्क्रीन, फिंगरप्रिंट स्कॅनर आणि 5mp कॅमेरा जो कमी लाईट मध्ये सुध्दा चालेल। चला मग जाणून घेऊयात ह्याची किंमत काय आणि स्पेसिफिकेशन कोणते आहेत।

Hp Spectre x360 किंमत किती आहे ?

ModelPrice
Hp Spectre x360 16-f1009TX₹179,999
Hp Spectre x360 13.5-ef2034TU₹149,999
Hp Spectre x360 16-f2005TX₹189,999

अजून वेगवेगळे मॉडेल्स HP च्या वेबसाइट वर उपलब्ध आहेत आणि त्यांच्या किंमती थोड्या फार वेगळ्या आहेत आणि जर तुम्ही त्यांच्या वेबसाइट वर लॅपटॉप घेतला तर तुम्हाला १०००० हजार पर्यंत कॅशबॅक देखील भेटणार आहे।

ह्या लॅपटॉपची खासियत काय आहे ?

हा लॅपटॉपला टच स्क्रीन आहे जेणेकरून तुम्ही ह्याचा एक टॅब म्हणून सुद्धा वापर करू शकता। ह्या लॅपटॉप सोबत तुम्ही टिल्ट पेनचा वापर करून तुमची कला सादर करू शकता। ह्या लॅपटॉपची स्क्रीन पूर्णपणे बेन्ड होऊ शकते।

फिंगरप्रिंट स्कॅनर सुद्धा दिलेला आहे ज्याने तुम्ही तुमच्या लॅपटॉपला फिंगरप्रिंट पासवर्ड घालू शकता आणि तुमचा लॅपटॉप सुरक्षित ठेवू शकता।

फीचर्स कोणते आहे?

  1. 5MP चा Front कॅमेरा
  2. फिंगर प्रिंट रीडर तुमच्या लॅपटॉपला अधिक सुरक्षा देण्यासाठी
  3. Backlit Keyboard
  4. दर्जेदार स्पीकर्स

Specification कोण कोणते आहेत?

ह्या सर्व मॉडेल्सना Oled स्क्रीन दिलेली आहे आणि सगळ्या लॅपटॉप मध्ये Windows 11 इंस्टॉल करून दिला जाईल आणि तुमच्या स्टोरेजसाठी 1tb ची Ssd दिली आहे। ह्या लॅपटॉप मधील प्रोसेसर लॅपटॉपच्या मॉडेल अनुसार बदलत राहतात वरील दिलेल्या 16-f1009TX ह्याचा प्रोसेसर intel i7 12 generation चा आहे। लॅपटॉपचा Ram 16gb आहे आणि प्रत्येक मोडेलचा प्रोसेसर किंवा Ram हे लॅपटॉपच्या किंमती अनुसार बदलत राहतात। गेमिंग साठी Intel कडून 4Gb चा VRam दिलेला आहे ज्यांनी तुम्ही छोट्या छोट्या गेम्स खेळू शकता । हे लॅपटॉप दोन वेगवेगळ्या रंगामध्ये उपलब्ध आहेत, निळा आणि काळा रंगामध्ये आणि ह्या वेगळ्या रंगासाठी कोणताही अतिरिक्त शुल्क आकारला जाणार नाही।

हा लॅपटॉप कुठे उपलब्ध आहे?

Hp च्या किंवा अन्य कोणत्याही ऑनलाईन वेबसाईटवर हे लॅपटॉप उपलब्ध आहेत जसे की Flipkart, Amazon इत्यादी। ह्या सर्व वेबसाईटवर किंमती मध्ये थोडी फार फरक दिसून येतील आणि तुम्ही जर ऑफलाईन कोणत्याही स्टोअर मधून घेण्यासाठी जाल तर तुम्हाला आणखी ज्यादा फरक दिसून येईल।

एका झडक्यात बदला तुमच्या फोन कव्हरचे फोटो। जाणून घ्या कसे ? येथे क्लिक करा ।

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *