Site icon बातम्या Now

अखेर येतोय OnePlus 13 – जाणून घ्या कधी होणार लाँच

OnePlus 13 release date

वनप्लसच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी! कंपनीचा बहुचर्चित फ्लॅगशिप फोन OnePlus13 लवकरच बाजारात येण्याची शक्यता आहे. Leaks आणि rumors च्या अनुसार, हा स्मार्टफोन डिसेंबर 2024 च्या अखेरपर्यंत चीनमध्ये लाँच होण्याची शक्यता आहे. त्यानंतर जानेवारी किंवा फेब्रुवारी 2025 मध्ये जगभरात लाँच केला जाऊ शकतो.

याआधीच्या OnePlus फोनच्या लाँचच्या आधारावर हा अंदाज लावला जातोय. अजून कंपनीकडून कोणतीही अधिकृत घोषणा आलेली नाही, परंतु आत्तापर्यंतच्या माहितीनुसार, OnePlus 13 हा एक दमदार परफॉर्मन्स आणि अत्याधुनिक फीचर्स देणारा फोन असणार आहे.

OnePlus 13 मध्ये काय आहे खास?

Leaks च्या मते, OnePlus 13 मध्ये अनेक आकर्षक फीचर्स असतील, जसे कि:

अजून OnePlus 13 ची किंमत जाहीर झालेली नाही. परंतु, मागील OnePlus फोनच्या किंमतीनुसार, हा फोन 50,000 ते 60,000 रुपयांच्या दरम्यान लाँच होण्याची शक्यता आहे.

भारतात OnePlus 13 ची अधिकृत लाँच जानेवारी किंवा फेब्रुवारी 2025 मध्ये होण्याची शक्यता आहे. परंतु, आपण कंपनीकडून येणाऱ्या अधिकृत अपडेट्सवर लक्ष ठेवू शकता.

OnePlus 13 हा निश्चितच अत्याधुनिक फीचर्स आणि दमदार परफॉर्मन्स देणारा फोन असणार आहे. जो आगामी काळात लाँच होणाऱ्या इतर फ्लॅगशिप फोनना कडवी टक्कर देण्याची क्षमता ठेवतो. OnePlus चा चाहता वर्ग OnePlus 13 ची आतुरतेने वाट पाहत आहे. आपल्याला OnePlus 13 बद्दल अधिक माहिती मिळताच आम्ही तुम्हाला अपडेट करत राहू.

Exit mobile version