Site icon बातम्या Now

Phone Cover: एका टचने बदलणार हा फोन कव्हर

ह्या Phone Cover ने तुम्हाला हवा तो आणि पाहिजे तो फोटो तुम्ही तुमच्या फोनला लावू शकणार आहात। तुम्हाला प्रत्येक वेळी नवनवीन फोन कव्हर घेण्याची गरज भासणार नाही आहे। तुम्ही केंव्हाही आणि कुठेही ह्या कव्हरचे फोटो बदलू शकता। तर मग चला जाणून घेऊयात कसे आहे हे फोन कव्हर।

Phone Cover जो बदलेले एका टचने

ज्या ज्या वेळी आपण नवीन फोन घेतो, त्या त्या वेळी आपल्याला नवीन फोन कव्हरची गरज ही असतेच आणि फोन सुरक्षित ठेवण्यासाठी फोन कव्हर हा चांगला पर्याय आहे। आपण किती तास आपल्याला पाहिजे तो फोन कव्हर शोधण्यासाठी वेळ घालवतो आणि काही दिवसानंतर असे वाटते की आपण आता दुसरा फोन कव्हर विकत घेतला पाहिजे। आपल्याला ह्या डोकेदुखी पासून वाचवण्यासाठी हा फोन कव्हर चांगला ऑप्शन आहे।

ह्या फोन कव्हर मध्ये आपल्याला पाहिजे तो फोटो, ईमोजी आणि तुम्हाला कविता किंवा गाण्याच्या बोल आवडत असतील तर ते देखील तुम्ही ठेवू शकता आणि हे सर्व तुम्ही तुमच्या फोनच्या ॲप द्वारे नियंत्रण करू शकता।

कसे काम करतो हा Phone Cover?

हा फोन कव्हर एन एफ सी (NFC) नियर फिल्ड कम्युनिकेशन च्या माध्यमातून काम करतो याला कोणत्याही वायरची किंवा कोणत्याही यंत्रणेची गरज लागत नाही। ह्या एन एफ सी च्या द्वारे तुम्ही तुमच्या कव्हरचे फोटो बदलू शकता। यात आश्चर्याची बाब अशी आहे की तुम्हाला हे कव्हर चार्ज करण्याची कोणत्याही चार्जर ची गरज सुध्दा नाही कारण एन एफ सी मधून हे फोन कव्हर आपल्याला लागेल तेवढी ऊर्जा घेत असते।

ह्या कव्हरच्या मागील बाजूला LED स्क्रीन आहे ज्यात तुम्हाला तुमचे लावलेले फोटो दिसतात आणि ज्यावेळी तुम्ही ॲप मध्ये एकदा फोटो सिलेक्ट करून लावता त्यावेळी हे एन एफ सी एक माध्यम होऊन Led स्क्रीनला तो फोटो पाठवण्याचे काम करते आणि तो फोटो मग तुम्हाला फोनच्या कव्हरमध्ये देसू लागतो।

ह्या फोन कव्हरची वैशिष्टे कोणती आहेत?

ह्या कव्हरला टेम्पर्ड ग्लास दिला आहे जेणेकरून फोन किंवा कव्हरला काहीही होऊ नये। स्क्रॅच प्रूफ सुध्दा आहे आणि AF कोटिंग असल्या मुळे कोणत्याही फिंगरप्रिंट कव्हर वर दिसून येत नाही।

कोणत्या फोनसाठी उपलब्ध आहे?

हे कव्हर बनवणारी कंपनीने आता फक्त iPhone 15 Pro आणि iPhone 15 Pro Max ह्या दोन फोनसाठी हे कव्हर सध्या लॉन्च केलेलं आहे आणि कंपनी भविष्यात Samsung किंवा इतर NFC असलेल्या फोनसाठी लॉन्च करण्याची शक्यता आहे।

कव्हरची किंमत किती आहे?

ह्या Phone Cover ची किंमत दिल्ली मध्ये ६ ते ७ हजार रुपयांपर्यंत आहे आणि हे कव्हर दोन वेगवेगळ्या रंगामध्ये उपलब्ध आहे। अजून हलक्या क्वालिटी मध्ये सुध्दा उपलब्ध आहे आणि ते ४ हजार रुपयात मध्ये आहे।

iPhone वापर करणाऱ्यांसाठी हे एक उत्तम कव्हर ठरू शकेल आणि जसे iPhone वापरनारे कसे फोनचा देखावा करतात तसे iPhone वापरनारे ह्या मस्त आणि कमालीच्या फोन कव्हरचा देखील देखावा करू शकतात।

Exit mobile version