केंद्र सरकारने ह्या वर्षीच्या रेल्वे भरती २०२४ चे कॅलेंडर जाहीर केलेलं आहे। ह्या वर्षी एकूण ४ परीक्षा होणार आहेत आणि ह्या भरत्यांसाठी अभ्यास आणि भरतीसाठी तयारी करण्यास मिळावी ह्यासाठी हे कॅलेंडर रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी जाहीर केलेलं आहे। एम पी एस सी आणि यू पी एस सी परीक्षांसारखे रेल्वेच्या भरतीचे पण एक वार्षिक कॅलेंडर सरकारने रेल्वेसाठी काढावे अशी मागणी वारंवार होत होती आणि शेवटी ती मागणी पूर्ण केलीय आणि आता रेल्वे भरतीसाठी सुद्धा एक वार्षिक कॅलेंडर सरकारने आणले आहे।
Table of Contents
रेल्वे भरती २०२४ कॅलेंडर
ह्या वर्षी होणाऱ्या सर्व रेल्वे भरत्यांची माहिती अगोदरच मिळेल त्यामुळे तयारी करणे व अभ्यास करण्यास पुरेसा वेळ दिला जाणार आहे, जेणेकरून कोणाला परीक्षा कधी आहे याची कल्पना आसावी आणि कोणी सुद्धा परीक्षा देण्यास चुकू नये यासाठी हे वार्षिक कॅलेंडरची घोषणा रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी केली आहे। रेल्वे मंडळाने तसे कॅलेंडर सुद्धा जाहीर केले आहे।
२०२४ मध्ये कोणत्या पोस्टची होणार भरती ?
एकूण ९००० जागांसाठी परीक्षा घेण्यात येणार आहेत अशी माहिती रेल्वे मंडळाकडून देण्यात येत आहे आणि ९००० हा आकडा देखील तात्पुरता आकडा आहे यात कधीही बदल होऊ शकतो।
असिस्टंट लोको पायलट (ALP)
असिस्टंट लोको पायलट ह्या भरत्या फेब्रवारी आणि मार्चच्या दरम्यान होण्याच्या शक्यता आहेत। ह्या पदासाठी किती जागा रिकाम्या हे अजून स्प्ष्ट करण्यात आलेलं नाही। ह्या पदासाठी ITI/Diploma आणि मॅट्रिक / SSLC हे पात्र आहेत।
तंत्रज्ञ
तंत्रज्ञ ह्या पदाच्या परीक्षा एप्रिल किंव्हा जून मध्ये होणार आहेत पण येणाऱ्या निवडणुकांमुळे ह्या पदांच्या परीक्षा फेब्रवारी मध्ये घेण्यात येऊ शकतात। या पदासाठी ITI किंव्हा SSCL उत्तीर्ण होणे आवश्यक आहे।
NTPC, कनिष्ठ अभियंते आणि पॅरामेडिकल श्रेणी
ह्या पदांच्या रेल्वे भरती जुलै ते सप्टेंबर दरम्यान होणार आहेत। ह्यामध्ये पदवीधर लेवल ४,५ आणि ६, पदवी न मिळवाल्यांच्यासाठी लेवल २ आणि ३ साठी परीक्षा होणार आहेत। कनिष्ठ अभियंते व पॅरामेडिकल सुद्धा परीक्षा होणार आहेत।
लेवल १, मंत्री आणि पृथक श्रेणी
ह्या पदांच्या रेल्वे भरती परीक्षा ऑक्टोबर ते डिसेंबर दरम्यान होणार आहेत। ह्या पदांसाठी तुमचे शिक्षण ITI किंवा १० पास असणे गरजेज आहे।
वरील दिलेल्या सगळ्या रेल्वे भरती २०२४ मधील वेगवेगळ्या महिन्यामध्ये ठेवण्यात आल्या आहेत आणि रेल्वे मंडळाने सर्व भरतीसाठी येणाऱ्या मुलांसाठी योग्य तो वेळ मेळावा यासाठी हे कॅलेंडर बनवण्यात आले आहे। या सर्व परीक्षांचे अर्ज रेल्वेच्या ऑनलाईन अधिकृत वेबसाईटवर भरू शकता।