बाहुबली आणि साहो प्रसिद्ध असलेल्या प्रभासचा चित्रपट “सालार” ची धूम गेल्या वर्षी बॉक्स ऑफिसवर झळाली होती. आता चाहत्यांच्या मनात “सालार 2” ची उत्सुकता निर्माण झाली आहे. मात्र, या चित्रपटाच्या निर्मितीबाबत काही नवीन अपडेट्स समोर आल्या आहेत आणि त्यामुळे चाहत्यांना थोडीशी निराशा होण्याची शक्यता आहे.
गेल्या काही महिन्यांपासून “सालार 2” ची चर्चा जोरदार होती. चित्रपटाचे दिग्दर्शन प्रशांत नील करणार असून, प्रभास मुख्य भूमिकेत दिसणार हे निश्चित होते. मात्र, मे 2024 मध्ये या चित्रपटाच्या निर्मितीवर पाणी फिरवल्याची चर्चा आली होती. प्रभास आणि दिग्दर्शक प्रशांत नील यांच्यातील मतभेदांमुळे हा चित्रपट थांबवण्यात आला असल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या.
पण चाहत्यांनो घाबरून जाण्याची गरज नाही! या सर्वच चर्चांवर निर्मात्यांनी लगेचच खुलासा केला. त्यांनी प्रभास आणि प्रशांत नील यांचा एकत्र हसणारा फोटो सोशल मिडियावर शेअर केला आणि चित्रपट थांबवण्याच्या बातम्या खोट्या असल्याचे स्पष्ट केले.
They can't stop laughing 😁
— Salaar (@SalaarTheSaga) May 26, 2024
#Prabhas #PrashanthNeel#Salaar pic.twitter.com/FW6RR2Y6Vx
असे असले तरी “सालार 2” च्या निर्मितीमध्ये थोडा विलंब होणार याची शक्यता आहे. पूर्वीच्या अंदाजानुसार, 2024 च्या उन्हाळ्यात या चित्रपटाचे चित्रीकरण सुरु होणार होते. पण आता यात बदल झाला आहे. “सालार 2” च्या विलंबामागे दिग्दर्शक प्रशांत नील यांचा दुसरा चित्रपट असण्याची शक्यता आहे. नील सध्या ज्युनियर एनटीआर सोबत “एनटीआर 31” या चित्रपटावर काम करीत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, ते सर्वप्रथम “एनटीआर 31” पूर्ण करणार आणि त्यानंतरच “सालार 2” ची निर्मिती हाती घेणार आहेत.
विलंब झाला असला तरी “सालार 2” बद्दल सकारात्मक संकेत आहेत. निर्माते चित्रपटाबाबत उत्साही आहेत आणि कलाकारही या चित्रपटासाठी तयार आहेत. अंदाजानुसार, या वर्षाच्या उत्तरार्धात या चित्रपटाचे चित्रीकरण सुरु होण्याची शक्यता आहे.