पेट्रोलच्या बरोबर इलेक्ट्रीकमध्ये ही येणार टाटा हॅरियर!

देशातील आघाडीची वाहन निर्माती कंपनी टाटा मोटर्स (Tata Motors) भारतीयांची उत्सुकता वाढवणारं पाऊल टाकणार आहे. कंपनी लवकरच लोकप्रिय हॅरियर (Harrier) SUV ची दोन नवीन आवृत्ती बाजारात आणणार आहे. यात एक अत्याधुनिक पेट्रोल इंजिन असलेली आवृत्ती आणि दुसरी पूर्ण इलेक्ट्रिक आवृत्ती समाविष्ट आहे. दोन्ही आवृत्तींची लॉन्चिंग 2025 च्या दुसऱ्या सहामाहीत अपेक्षित आहे.

टाटा हॅरियर पेट्रोल ही नवीन 1.5-liter टर्बोचार्ज्ड GDi पेट्रोल इंजिनने चालणार आहे. हे इंजिन 170 bhp power आणि 280 Nm torque जनरेट करेल. यासोबत 6-स्पीड मॅन्युअल आणि 6-स्पीड ऑटोमॅटिक ट्रांसमिशन पर्याय उपलब्ध असतील. भारतातील SUV बाजारपेठेत टाटा हॅरियर पेट्रोलची Hyundai Creta, Kia Seltos, Skoda Kushaq, Volkswagen Taigun, Maruti Suzuki Grand Vitara आणि Toyota Urban Cruiser Hyryder यांच्याशी स्पर्धा पाहायला मिळणार आहे.

पेट्रोल आवृत्तीसोबतच टाटा मोटर्स इलेक्ट्रिक वाहनांच्या क्षेत्रातही आपला जलवा दाखवणार आहे. टाटाची नवीन “acti.ev” इलेक्ट्रिक वाहन आर्किटेक्चरवर आधारित असलेली हॅरियर इलेक्ट्रिक बाजारात येणार आहे. सुमारे 60 kWh ची बॅटरी पॅक असलेल्या या गाडीची एका चार्जवर सुमारे 400-500 किलोमीटर इतकी रेंज असण्याची शक्यता आहे. आधुनिकतेची झलक दाखवणारी ही गाडी वाहनाद्वारे घराला वीज पुरवठा (Vehicle-to-Load – V2L) आणि वाहनाद्वारे वाहनाला चार्जिंग (Vehicle-to-Vehicle – V2V) सारख्या खास वैशिष्ट्यांसह येईल. भारतातील इलेक्ट्रिक SUV बाजारपेठेत टाटा हॅरियर इलेक्ट्रिकची MG ZS EV, Hyundai Kona Electric आणि येत्या Mahindra XUV400 Electric यांच्याशी स्पर्धा होण्याची शक्यता आहे.

पेट्रोल आवृत्ती ही किफायतशीर पर्याय असणार आहे. पण वाढत्या इंधन दरान पेट्रोल गाडीवर होणारा खर्च ग्राहकांना विचारात घ्यावा लागणार आहे. दुसरीकडे, हॅरियर इलेक्ट्रिक ही पर्यावरणपूरक पर्याय असून दीर्घकालीन स्वस्त खर्चात्मक ठरू शकते. मात्र, चार्जिंग स्टेशनची मर्यादित उपलब्धता आणि प्रारंभिक किंमत जास्त असणे हे काही मर्यादक मुद्दे ठरू शकतात.

टाटा हॅरियर पेट्रोलची किंमत सध्याच्या हॅरियरच्या किमतीच्या आसपास असण्याची शक्यता आहे. सध्याच्या हॅरियरची किंमत ₹ 14 लाख ते ₹ 21 लाख (एक्स-शरूम दिल्ली) दरम्यान आहे. हॅरियर इलेक्ट्रिकची किंमत मात्र जास्त असण्याची शक्यता आहे. अंदाजानुसार ही किंमत ₹ 20 लाख ते ₹ 25 लाख (एक्स-शोरूम दिल्ली) दरम्यान असू शकते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *