Site icon बातम्या Now

Thalapathy Vijay ने चालू केला स्वतःचा राजकीय पक्ष

Thalapathy Vijay

तामिळचे दिग्गज अभिनेते Thalapathy Vijay यांनी फेब्रुवारी २, २०२४ मध्ये आपला राजकीय पक्ष “तमिझगा वेत्री कळघम” म्हणजेज तामिळनाडू विजय पक्ष याची घोषणा केली आहे। त्याने येणाऱ्या २०२४ च्या कोणत्याही निवडणुकांमध्ये भाग घेणार नाही असे ही स्पष्ट सांगितले आहे आणि कोणत्याही पक्षाला आपले समर्थन देणार नाही असे सुद्धा सांगितले आहे। ही बातमी त्यांनी त्यांच्या ट्विटर च्या माध्यमातून सर्व तामिळनाडूच्या लोकांना सांगितली आहे।

Thalapathy Vijay आणि TVK

विजय हे ह्या पक्षाचे अध्यक्ष असणार आहेत आणि २०२४ मधल्या कोणत्याही निवडणूक हा पक्ष लढवणार नाही। विजयने आपला पक्ष तमिझगा वेत्री कळघम(TVK) निवडणूक आयोगामध्ये नोंद करताच असे म्हणाले आहे कि मी हा पक्ष जनतेचे देणे लागतो म्हणून स्थापन केला आहे। ह्या पक्षाचे स्थापन करण्याचे मुख्य कारण त्यांनी असे सांगितले आहे कि तामिळनाडूच्या २०२६ मधील येणाऱ्या विधानसभा निवडणुका लढवणे आणि त्यामध्ये विजय मिळवणे आहे।

हे सत्य आहे की तामिळनाडूतील प्रत्येकजण अशा राजकीय बदलाची आकांक्षा बाळगून आहे जो निःस्वार्थ, पारदर्शक, जात आणि धर्ममुक्त, दूरदर्शी आणि भ्रष्टाचारमुक्त प्रशासन देईल। असे राजकारण या भूमीच्या समतावादी तत्त्वावर, संविधानावर आणि राज्याच्या अधिकारांवर आधारित असले पाहिजे। असा मूलभूत राजकीय बदल लोकांचे प्रेम आणि पाठिंबा मिळवणाऱ्या प्राधिकरणामुळेच शक्य होऊ शकतो।

विजय असे म्हणाले

कधीपासून चालू करणार प्रचार ?

विजय आपल्या पक्षाचा प्रचार त्यांच्या येणार चित्रपटाचे शूटिंग संपवून २०२६ च्या तामिळनाडू मध्ये येणाऱ्या विधानसभा निवडणुकांमध्ये करणार आहेत। विजयचा तामिळनाडूमध्ये सर्वाधिक चाहता वर्ग आहे, जो रजनीकांतपेक्षा थोडासा खाली आहे आणि येत्या काही दिवसांत तो त्यांच्या राजकीय पक्षासोबत आणखी मजबूत होईल हे नक्कीच। आता चालू असलेल्या एमके स्टॅलिन यांच्या नेतृत्वाखालील DMK चा कार्यकाळ संपेल तेंव्हा विजय त्यांच्या पक्षासोबत निवडणूक लढवतील।

त्यांचा चाहता वर्ग त्यांना Thalapathy Vijay असे म्हणून बोलवतात, ह्याचा अर्थ जनरल किंवा कमांडर असा होतो। अगोदर पण भरपूर अभिनेत्यांनी राजकरणात प्रवेश केला आहे पण विजयच्या बाबतीत जरा वेगळे आहे कारण त्यांचा चाहता वर्ग खूप मोठया संकेत आहे। त्यांच्या चित्रपटाच्या वेळी तुफान गर्दी पाहून सगळ्यांना धक्का बसतो। यात कोणतीच शंका नाही की विजय यांचा राजकारणात उतरल्यामुळे तामिळनाडूतील लोकांमध्ये जल्लोष चालू आहे आणि काही लोंकाच्या चेहेऱ्यावर नाराजकी।

Exit mobile version