मुंबई – भारतातील रेल्वे नेटवर्क आणखी स्मार्ट आणि वेगवान करण्याच्या दिशेने भारतीय रेल्वेने एक नवीन उपक्रम हाती घेतला आहे. ‘वंदे भारत‘ या सेमी हायस्पीड रेल्वेनंतर आता ‘वंदे मेट्रो‘ नावाचा नवीन प्रकल्प राबवला जात आहे. हा प्रकल्प जवळच्या शहरांमधील प्रवासी आणि मालवाहतुवीला वेगवान आणि आरामदायक पर्याय देण्यावर भर दिला गेला आहे.
भारतात अनेक मोठ्या शहरांमध्ये स्थानिक रेल्वे सेवा उपलब्ध आहेत. मात्र, शहरांच्या विस्तारामुळे या सेवांवर ताण पडत आहे. त्याचबरोबर काही शहरांमध्ये अजूनही रेल्वे सेवा पोहोचलेली नाही. या सर्व समस्यांचे निराकरण करण्यासाठी आणि शहरांमधील कनेक्टिव्हिटी वाढवण्यासाठी वंदे मेट्रो हा उपयुक्त पर्याय ठरू शकेल.
Finally, Vande Metro is here!
— The Uttar Pradesh Index (@theupindex) May 2, 2024
First train set rolled out from ICF, Chennai.
Looks beautiful❣️
Two routes in UP where Vande Metro will be an instant hit, are Lucknow-Kanpur & Varanasi-Prayagraj. pic.twitter.com/JE829CsX0X
100 ते 250 किलोमीटर (62 ते 155 मैल) इतक्या अंतरावरील प्रमुख शहरांना जोडणारा हा रेल्वे प्रकल्प आहे. 16 वातानुकूलित डबे असलेल्या या रेल्वेमध्ये सुमारे 280 प्रवासी प्रवास करू शकतात. वेगवान चढण आणि उतरणासाठी स्वयंचलित दरवाजे. स्वच्छतेसाठी टच-फ्री दरवाजे.अपंगत्व असलेल्या प्रवाशांसाठी सुसज्ज शौचालय.प्रवासी आणि रेल्वे कर्मचार्यांमधील संवादासाठी पाॅसेंजर टॉकबॅक सिस्टीम. वाढलेली सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी अग्नि आणि धूर शोधक यंत्रणा. कवच नावाची टक्कर टाळण्याची यंत्रणा. या सर्व वैशिष्ट्यांपासून वंदे मेट्रो बनवण्यात आली आहे.
जुन्या पर्यायांच्या तुलनेत वंदे मेट्रो प्रवाशांना वेगवान आणि सोयीस्कर प्रवास अनुभव देईल. वातानुकूलित डबे विशेषत: उन्हाळ्याच्या दिवसात प्रवास अधिक सुखद करतील. शहरांमधील वाढलेली कनेक्टिव्हिटीमुळे आर्थिक चळवळ आणि क्षेत्रीय विकासाला चालना मिळेल. वंदे मेट्रो हा भारतातील स्थानिक प्रवासाला वेग आणि आराम देण्यासाठी एक आशादायक उपक्रम आहे. या प्रकल्पामुळे येत्या काळात शहरांमधील प्रवासी आणि मालवाहतुवीमध्ये मोठी परिवर्तने घडण्याची शक्यता आहे.