२०२३ चा बहुचर्चित आणि हिट Kerala Files: Ott वर होणार रिलीज

The Kerala Files च्या Ott रिलीजची प्रतीक्षा करणार्यांना आनंदाची बातमी आली आहे, त्यांची प्रतिक्षेची वेळ आता संपली कारण Kerala Files Ott वर रिलीज होणार आहे। अशी बातमी Zee5 कडून देण्यात आली आहे आणि त्यांनी ही बातमी त्यांच्या इंस्टाग्रामच्या माध्यमातून सांगितली आहे।

The Kerala Files: कधी होणार रिलीज ?

Zee5 हे झी मीडियाचे ऑनलाईन स्ट्रीमिंग ऍप आहे आणि त्यांनी केलेल्या पोस्ट मधून असे सांगितले आहे कि Kerala Files हा चित्रपट येत्या १६ फेब्रवारीला २०२४ Zee5 वर प्रदर्शित होणार आहे आणि त्यांनी पोस्ट मध्ये असे सुद्धा सांगितले आहे कि, दर्शकांकडून सर्वात ज्यास्त मागणी केलेला चित्रपट आहे The Kerala Files आणि त्या मागणीला साद Zee5 यांनी दिली आहे।

ओटीटी वर येण्यासाठी का वेळ लागला ?

हा चित्रपट गेल्या वर्षी ५ मे २०२३ ला चित्रपट गृहात प्रदर्शित झाला होता। तसे पाहायला गेले तर एका चित्रपटाला चित्रपट गृहातून ओटीटी वर येण्यासाठी दीड ते दोन महिन्यांचा अवधी लागतो पण हा चित्रपट जवळ जवळ एका वर्ष कोणत्याही ओटीटी प्लॅटफॉर्म वर आला नाही। याचे कारण विचारल्यास ह्या चित्रपटाचे निर्माते म्हणाले की हा चित्रपट देण्यासाठी चांगली ऑफर आलेली नाही। ह्या कारणामुळे ह्या चित्रपटाला ओटीटी वर येण्यास वेळ लागला होता।

बॉक्स ऑफिस हिट २०२३

ह्या चित्रपटाच्या वेगळ्या स्टोरीने आणि अभिनेत्री अदा शर्मा च्या उत्तम अभिनयामुळे हा चित्रपट २०२३ चा सर्वात मोठा बॉक्स ऑफिस हिट होता आणि ह्या चित्रपटाची चर्चा सर्वत्र चालू होती। ह्या चित्रपटाला बनवण्याचा खर्च १५ ते २० कोटी दरम्यान होता पण ह्या चित्रपटाने बॉक्स ऑफिस च्या संकलन मध्ये ३०० कोटी पर्यंत कमावले होते। ह्याची स्टोरी अत्याचार होणाऱ्या केरळच्या मुलींवर होती, ज्यांना प्रेम प्रकरणात अडकून दहशदवाद्यांना विकल्या जायचे। नाही कोणी सुपरस्टार नाही कोणी सुपरहेरॉईन तरी पण हा चित्रपट बॉक्स ऑफिस वर आपली छाप सोडून गेला आणि लोकांनी सुद्धा ह्याला खूप प्रतिसाद दिला।

दिग्दर्शक आणि निर्माते कोण आहेत ?

sen & shah

दिग्दर्शक : सुदीप्तो सेन

सुदीप्तो सेन हे केरळ फाइल्स चे दिग्दर्शक आहेत आणि हा त्यांचा पहिला बहुचर्चित चित्रपट ठरला आहे, ह्या अगोदर त्यांचे फारसे चित्रपट प्रकाशजोकात आले नाहीत पण ह्या चित्रपटामुळे त्यांना खूप प्रसिद्धी मिळाली।

निर्माता: विपुल अमृतलाल शाह

विपुल अमृतलाल शाह हे ह्या चित्रपटाचे निर्माते आहेत आणि त्यांनी ह्या अगोदर सुद्धा खूप सारे हिट चित्रपट दिलेले आहेत त्यामधील कमांडो, अक्षय कुमारचा नमस्ते लंडन आणि बरेच काही। केरळ फाइल्स हा त्यांचा ब्लॉक बस्टर चित्रपट ठरला होता।

ह्या दोघांचा पुन्हा एकदा एका नवीन चित्रपट मार्च २०२४ मध्ये येणार आहे आणि त्यामध्ये सुद्धा अदा शर्माच प्रमुख भूमिकेत दिसणार आहे आणि ह्या चित्रपटाचे नाव बस्तर असे आहे।

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *