Startup: ७ नवीन आणि प्रेरणादायी स्टार्टअप्स

Startup च्या दुनियेत २०१४ मध्ये भारतात केवळ ३५० Startup होते आणि ते आता २०२३ मध्ये १,००,००० अधिक DPIIT मान्यताप्राप्त Startup कंपन्या रजिस्टर झाल्या आहेत।

भारत हा जगातील ३ री सर्वात मोठी स्टार्टअप इकोसिस्टीम झालेला आहे।

Startup मध्ये सगळ्यात यशस्वी ठरलेले कंपन्या ह्या शहरातील नसून ते गावातील आहेत असे सरकारी अकड्या वरून लक्षात येत आहे। तर मग चला जाणून घेऊयात ते कोण कोणते ७ स्टार्टअप आहेत।

१. स्वयंचलित स्मार्ट सिंचन Startup

हा स्टार्टअप कर्नाटकचे मल्लेश टी एम यांचा आहे, Cultyvate असे ह्या स्टार्टअपचे नाव आहे।

हा स्टार्टअप भात उत्पादक शेतकऱ्यांसाठी बनवण्यात आला आहे। भात उत्पादक शेतकरी प्रति हेक्टरी २ कोटी लिटर पाणी वापरतो, जर ह्याचा वापर केला तर ५०% कमी पाणी वापरून भात पिकवता येतो। इंटरनेट ऑफ थिंग्ज (IoT), रिमोट सेन्सिंग वापरून, स्मार्ट सिंचन सल्ला आणि कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) चा उपयोग करून पाण्याची पातळी मोजतात आणि रिअल-टाइममध्ये शेतकऱ्यांना त्यांच्या ॲपवर पाणी चालू किंवा बंद करण्याचा संदेश देतो।

२. ड्रॉप-इन बायोफ्यूल

Greenjoules

Greenjoules पुणे ह्या कंपनीने हा स्टार्टअप चालू केला आणि शंकरन विरारघवन यांचा हा स्टार्टअप आहे।

डिझेल हे एक महत्त्वपूर्ण इंधन आहे जे वाहने, बॉयलर इ. चालवण्यात मदत करतो आणि वातावरणातील बदल घडवून आणणारे प्रदूषक देखील आहेत. Greenjoules देते एक डिझेल बदलण्यासाठी पर्यायी, पर्यावरणास अनुकूल इंधन।

Greenjoules Pvt Ltd. कृषी इंडस्ट्रियलमधून जैवीइंधन तयार करते। आपले अगोदरच्या उपकरणे न बदलता डिझेलला १००% पर्यायी किंवा डिझेल मध्ये मिश्रण करून देखील बायोफ्युल वापरता येते. ग्रीनज्यूल वायू इंधन आणि बायोचार देखील तयार करतात.

३. सेल्फ चार्जिंग सिस्टम

हा स्टार्टअप विपण धिमन यांनी चालू केला आणि ह्या प्रॉडक्ट चे नाव Leopan Motors असे आहे। हा हिमाचल मधला स्टार्टअप आहे।

इलेक्ट्रिक वाहनांची सर्वात मोठी समस्या ही त्याच्या बॅटरीला सतत रिचार्ज करणे, ज्यामुळे चार्जिंगची वेळ वाढते आणि कमी होते बॅटरीचे आयुष्य।

ई-रिक्षा सेल्फ चार्जिंग सिस्टीमने त्या बॅटरी बॅकअपला राखण्यास मदत होईल आणि चार्जिंगमध्ये मदत करेल ५० ते ८० % पर्यंत।

४. Pocketly

Pocketly (Nagpur) हे तरुण पिढीवर लक्ष केंद्रित करणारे फिनटेक स्टार्टअप आहे। ह्या स्टार्टअप चे फौंडर आरव भाटिया आणि नवदेश आहुजा हे आहेत।

पॉकेटलीचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे हा आहे। जेणेकरून ते त्यांच्या शिक्षणावर पूर्णपणे लक्ष केंद्रित करू शकतील। इतर कोणत्याही पारंपारिक कर्ज देणाऱ्या संस्थेकडून, विद्यार्थ्याला भेडसावणारी मुख्य समस्या काही टेव किंवा काहीतर बँकांमध्ये गहाण द्यावी लागते। जे पॉकेटलीच्या बाबतीत नाही कारण त्याची तशी मागणी सुध्दा नाही।

५. Byteseal

हा स्टार्टअप पुण्यातील निकीलेश वाणी यांचा आहे।

एकूणच सायबर गुन्ह्यांचे प्रमाण चिंताजनक वेगाने वाढत आहे। जगाच्या आकडेवारीवरून असे दिसून आले आहे की ८०% सायबर हल्ले मानवामुळे होतात (उदा. कमकुवत पासवर्ड सेट करणे, पासवर्ड शेअर करणे, फिशिंग हल्ले इ.) Byteseal या समस्येचे निराकरण प्रथम-स्वरूपाने करते।

Byteseal बायोमेट्रिक आयडी जगातील सर्वात प्रगत आणि सुरक्षित वायरलेस इंटरफेससह बायोमेट्रिक प्रमाणीकरण तंत्रज्ञान आहे। ब्लूटूथ आणि नियर फील्ड कम्युनिकेशन (NFC) कारणामुळे ते सहज पोर्टेबल आहे, वापरकर्ते फिंगरप्रिंटच्या फक्त एका टॅपने त्यांच्या ऑनलाइन खात्यांमध्ये लॉग इन करू शकतात। डिव्हाइस इतरांसाठी देखील उपयुक्त आहे ऑनलाइन पेमेंट, ई-केवायसी।

६. Midgrad Electric

Ev गाड्यांसाठी चार्जिंगच्या पुरेशा सुविधांचा अभाव आहे। ह्या वाहनांना पुरेशा प्रमाणात इलेक्ट्रिक ग्रिड उपलब्ध नाहीत । ह्या समस्यांना ओळखून मिडग्राड चे फौन्डर अभिजित विजयन यांनी त्यांचा स्टार्टअप बेंगलोर मध्ये चालू केला आहे ।

मिडग्राड ही इलेक्ट्रिक वाहन (EV) चार्जिंग सेवा कंपनी आहे। जी मल्टी-ब्रँड गाड्यांसाठी इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग स्टेशन स्थापित आणि देखरेख करते। २ KW ते १५ KW पर्यंतची मशीनरी उपलब्ध करतात. चार्जिंग स्टेशन मध्ये २, ३ आणि ४ चाकी गाड्यासाठी सेवा देतात। ईव्हीसीएससीओ मॉडेल ‘सेवा म्हणून हार्डवेअर’ म्हणून त्यांची कंपनी कार्य करते। मोबाइलच्या ॲप द्वारे वापरकर्त्यांना सहजपणे चार्जिंग सुविधाकडे, नेव्हिगेट करण्यास आणि कनेक्ट करण्यात मदत करते। ॲप वापरकर्त्यांना जलद पेमेंट करण्यात सुध्दा मदत करते।

७. UAV: वजनदार सामान नेण्यासाठी

Uav अत्यावश्यक आणि अवजड वस्तूंच्या वाहतुकीच्या अभावाच्या समस्येचे निवारण करते। नैसर्गिक आपत्तींमुळे बाधित झालेल्या भागात माल पोचवणे आणि त्यासाठी योग्य माध्यमाचा उपयोग करून म्हणजेच टोपोग्राफिक मॅपिंगमध्ये आणि Lidar हे शक्य झाले आहे। Startup रितेश कान, बिस्वाजित डे आणि देबाजित डेका यांनी कोलकाता मध्ये सुरू केला आहे।

UAV शक्तिशाली आहे (30 किलो पर्यंत उचलू शकते) तरीही ते हलके आणि कॉम्पॅक्ट, ४ काढता येण्याजोग्या आर्म्स आणि लँडिंग गीअर्ससह जे वाहतूक करणे खूप सोपे आहे। इन-हाऊस डिझाइन केलेल्या कार्बन फायबर फ्रेम आणि एनोडाइज्डमुळे अत्यंत प्रतिरोधक ॲल्युमिनियम फास्टनर्स। नैसर्गिक आपत्तीच्या परिसरात अत्यावश्यक वस्तूंच्या वाहतुकीसाठी याचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जाऊ शकतो। जेथे पोहचणे अशक्य आहे आणि महत्त्वाच्या वेळी आवश्यक जड उपकरणे वाहून नेण्यास याचा उपयोग होऊ शकतो।

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *