मुकेश अंबानी यांचे सुपुत्र अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा विवाह लवकरच होणार आहे. या लग्नाची चर्चा सर्वत्र सुरू असतानाच आता या लग्नाच्या निमंत्रणाचा कार्डच चर्चेत आलं आहे. कारण, हा कार्ड आपल्या नेहमीच्या लग्नपत्रिकेपेक्षा वेगळा आणि अत्यंत अनोखं करून तयार करण्यात आला आहे.
#WATCH | Video of wedding invitation card of Anant Ambani and Radhika Merchant as shared by one of the card recepients pic.twitter.com/zTas6pjsUM
— ANI (@ANI) June 27, 2024
अंबानी घराण्यासाठी विराट लग्नसोहळे आणि आगळीक वस्तू हे काही नवे नाही. मात्र, यावेळी त्यांनी लग्नपत्रिकेच्या बाबतीतही वेगळा आणि कलात्मक असा दृष्टिकोन स्वीकारला आहे. ही लग्नपत्रिका कार्डापेक्षा एखाद्या आलिशान बॉक्ससारखी दिसते.
- रॉयल लाल रंगाची मखमली बॉक्स: कार्ड एका आकर्षक लाल मखमली बॉक्समध्ये येतो.
- मूर्ती असलेले चांदीचे छोटेसे मंदिर: या बॉक्समध्ये चांदीचे छोटे मंदिर असून त्याच्या आत सोन्याच्या गणेश आणि राधा-कृष्णाची मुर्ती आहेत.
- लग्नपत्रिका ठेवण्यासाठी असलेली चांदीची छोटी बॉक्स:
- मिठाई आणि ड्रायफ्रुट्स: या मंदिराजवळ एका चांदीच्या बॉक्समध्ये लग्नाची पत्रिका आणि मिठाई ठेवलेली आहे.
- नीता अंबानी यांचेकडून लिहिलेला हस्ताक्षरित संदेश: या कार्डमध्ये खास वैशिष्ट्य म्हणजे नीता अंबानी यांची स्वहस्ताक्षरी नोट समाविष्ट आहे.
- काश्मिरी पश्मीना शाल: या सर्व वस्तूंसह एक सुंदर काश्मिरी पश्मीना शाल देखील या बॉक्समध्ये आहे.
या लग्नपत्रिकेचे वैशिष्ट्य म्हणजे पारंपारिक भारतीय कला आणि लग्नसोहळ्यांचा थाट यांचा सुंदर संगम आहे. सोन्याच्या मूर्ती आणि चांदीच्या मंदिरामुळे या लग्नपत्रिकेची श्रीमंती अधोरेखित होते. तसेच, हस्ताक्षरित संदेशाचा अंतर्भाव हा एक वेगळा आणि हृद्यस्पर्शी पैलू आहे.
अंबानींच्या लग्नपत्रिकेची सोशल मीडियावर चांगली चर्चा सुरू आहे. काहीं लोकांनी या लग्नपत्रिकेच्या डिझाइन आणि कलात्मकतेचे कौतुक केले आहे. तर काहींनी या लग्नपत्रिकेच्या अचाटपणाबद्दल मजेदार टिप्पण्या केल्या आहेत.