Dilip Kumar V Lakhi यांनी केलेले हे दान सर्वत्र चर्चेला आलेलं आहे कारण त्यांचे हे दान सर्वांचे लक्षय वेधुन घेतले आहे। एवढे मोठे दान करणारे दिलीप कुमार हे पहिले वक्ती झालेले आहेत।
श्रीराम लालाचा प्राणप्रतिष्ठा सोहळा २२ जानेवारी २०२४ अयोध्या येथे झाला, नुकतेच झालेल्या ह्या सोहळ्यात देशातून अनेक भाविक आले होते आणि ह्या भाविकाने भरपूर असे दान देखील केले त्यातील एक दान हे तब्बल १०१ किलो सोन्याचे होते आणि ते Dilip Kumar V Lakhi यांनी केले आहे।
कोण आहेत Dilip Kumar V Lakhi ?
दिलीप कुमार व्ही लाखी हे गुजरात मधील सुरत येथे आपल्या परिवारासह राहतात। त्यांचे कुटुंब हे हिऱ्यातील सर्वात जुन्या व्यापाऱ्यांपैकी एक आहे। दिलीप कुमार यांनी केलेले १०१ किलो सोन्याचे दान हे सर्वात अधिक आणि सर्वात मोठे दान अयोध्येतील श्रीराम मंदिर मिळालेले आहे। ह्या सोन्याचा उपयोग दरवाजे, गर्भगृह, खांब इत्यादी बनवण्यासाठी होणार आहे अशी माहिती श्री राम जन्मभूमि तीर्थ क्षेत्र ट्रस्ट यांच्याकडून देण्यात आली आहे।
१०१ कोटी म्हणजे नेमके किती रुपये ?
असे म्हणतात की देवाला केलेलं दान हे श्रद्धा पोटी केलेलं असते आणि ते अमूल्य असते, त्याचे मूल्य सुद्धा लावता येत नाही। तरीपण जर मूल्य काढायचे असेल तर आजच्या चालू असलेल्या बाजार भावानुसार १० ग्राम सोने हे ६४ हजार रुपयां भेटत आहे, मग १०० ग्रामची किंमत ६ लाख ४० हजार इतकी आहे, अश्याप्रकारे १०१ किलो सोन्याचे भाव जवळपास ६५ कोटी इतका होऊ शकतो। दिलीप कुमार व्ही लाखी हे सर्वात मोठे दान करणारे व्यक्ती ठरले आहेत श्रीराम जन्मभूमि तीर्थ क्षेत्र ट्रस्टच्या म्हण्यानुसारे। एकूण ३२०० कोटी आता पर्यंत दान आलेलं आहे।
अंबानी यांना सुद्धा सोडले मागे
भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती अनिल अंबानी यांच्याहून अधिक दान हे गुजरात मधील हिरे व्यापार करणारे दिलीप कुमार व्ही लाखी आहेत। अनिल अंबानी यांनी २.५१ कोटी एव्हडी रक्कम श्रीराम मंदिर बनवण्याकरिता दान केले आहेत आणि तब्बल १२ कोटी लोकांनी आपल्या स्वच्छेने होईल तेवढे दान हे श्रीराम मंदिर बनवण्याकरिता दिले आहेत।
मोरारी बापू ठरले दुसरे सर्वात मोठे दानकारी
कथा वाचक आणि आध्यात्मिक गुरु मोरारी बापू हे दुसरे मोठे दान करणारे ठरले आहेत। गुरु मोरारी बापू यांनी १८.६ कोटी इतके पैसे श्रीराम मंदिर स्थापनेसाठी दान केलेले आहेत आणि बापू हे सर्वात जास्त दान करणारे दुसरे व्यक्ती ठरले आहेत।
अशीच एक कौतुकास्पद गोष्ट नवीन आलेला चित्रपट हनुमानच्या निर्मात्यांनी सुद्धा केली आहे, त्यांनी सुद्धा आपल्या होणाऱ्या प्रत्येक तिकीट विक्रीमधून ५ रुपये हे श्रीराम मंदिर बनवण्याकरिता दान करायचा निर्णय घेतला आहे।