Gautam Adani: पुन्हा एकदा जगातल्या श्रीमंतीच्या यादीत झाले सामील

Gautam Adani अदानी ग्रुपचे चेअरमन पुन्हा एकदा जगातील सर्वात श्रीमंत लोकांच्या यादीत सामील झाले आहेत। ते आता जगातील १२ वे सर्वात श्रीमंत व्यक्ती झाले आहेत अशी बातमी ब्लूमबर्ग न्यूज कडून देण्यात आलेली आहे। ब्लूमबर्ग च्या अनुसार गौतम अदानीची निव्वळ संपत्ती १००.७ अब्ज कोटी पर्यंत वाढली आहे। ब्लूमबर्गने असे सुद्धा सांगितले आहे की गौतम अदानी यांनी ह्यावर्षी १६.४ अब्ज डॉलर परत मिळवले आहेत।

Gautam Adani: तिसऱ्या नंबर वरून बावीस वर ?

फेब्रवारी २०२२ मध्ये ते आशिया खंडातील सर्वात जास्त श्रीमंत मुकेश अंबानी यांना पाठीमागे सोडून त्यांनी पहिला नंबर घेतला आणि ऑगस्ट २०२२ मध्ये ते जगातले तिसरे श्रीमंत व्यक्ती घोषित झाले होते।

खाली जाणाऱ्या शेअर मार्केटचा चार्ट

मग त्यांच्या कंपनीवर फसवणुकीचा आरोप जानेवारी २०२३ मध्ये लावला केला, न्यू यॉर्क मधील गुंतवणूक फर्म हिंडेनबर्ग रिसर्चने “अदानी ग्रुप: हाऊ द वर्ल्ड्स ३र्ड रिचेस्ट मॅन इज पुलिंग द लार्जेस्ट कॉन्स इन कॉर्पोरेट हिस्ट्री” हे शीर्षक देऊन एक रिपोर्ट प्रकाशित केली। त्यापाठोपाठ अदानी ग्रुपचा एकूण ४५ अब्ज डॉलर्सचा तोटा झाला। या नुकसानीमुळे अदानी फोर्ब्सच्या अब्जाधीशांच्या ट्रॅकरमध्ये जगातील तिसऱ्या सर्वात श्रीमंत व्यक्ती वरून २२ व्या स्थानावर घसरले।

रिपोर्टमध्ये अडाणी ग्रुपच्या मोठ्या प्रमाणावर कर्ज असल्याचा आणि अनिश्चित आर्थिक पायावर असल्याचा आरोप करण्यात आला होता। हा अहवाल अदानी एंटरप्रायझेसच्या पब्लिक ऑफरच्या आधी जारी करण्यात आला आणि अदानी समूहाचे सीएफओ जुगशिंदर सिंग यांनी सांगितले की ह्या रेपोर्टच्या प्रकाशनाची वेळ हा पब्लिक ऑफरला हानी पोहोचवण्याचा एक कारस्थान होते।

आता पुन्हा बावीस वरून बारा पर्यंत कसे ?

जेव्हा हिडनबर्ग ने अडाणी ग्रुपवर आरोप केले होते तेंव्हा अडाणी ग्रुपचे तब्बल १५० अब्जकोटी रुपयांचा तोटा झाला होता आणि त्यांचे शेअर्स सुध्दा खूप तेजीने खाली पडत गेले होते, अडाणी ग्रुप कडून जेंव्हा ह्या सगळ्या आरोपीचे उत्तर देण्यात आले तेंव्हा अडाणी ग्रुपला लोकांकडून आणि त्यांच्या गुंवणूकदारांकडून चांगला प्रतिसाद मिळू लागला आणि अडाणी ग्रुप हळू हळू आपले झालेले नुकसान कव्हर करू लागले।

वर जाणाऱ्या शेअर मार्केटचा चार्ट

अदानी ग्रुपवर केलेल्या सर्व आरोप जेंव्हा सिद्द नाही झाले तेंव्हा अडाणी ग्रुपच्या वेगवेगळ्या सेक्टर मधील कंपन्यांना बाहेरून आणि लोकांनी अदानी ग्रुपचे शेअर घेण्यास(इन्व्हेस्टमेंट) चालू केले।

Gautam Adani ह्यांना कोणाकडून इन्वेस्टींग मिळाले आहे ?

राजीव जैन यांच्या GQG Partners LLC ने गेल्या वर्षी अदानी समूहाच्या कंपन्यांमध्ये सुमारे ४ अब्ज डॉलर्स इन्व्हेस्ट केले। Qatar Investment Authority २०२३ मध्ये जवळपास ५०० दशलक्ष डॉलर्स आणि TotalEnergies SE ने ३०० दशलक्ष डॉलर्स अदानी ग्रीन एनर्जीसह संयुक्त उपक्रमात गुंतवणूक केली आहे। बेन कॅपिटलने १.४ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक केली ।

त्यांच्या काही कंपनीच्या प्रोफिट्स ६५% इतके वाढले आहेत आणि ह्या सर्व इन्व्हेस्टमेंटमुळे गौतम अदानी पुन्हा एकदा जगातील सर्वात श्रीमंतीच्या यादीत १२ वे स्थान स्थानावर पोहोचले आहेत आणि त्यांच्या कंपनीच्या प्रोफिट्स कडे बघून असे वाटते कि ते पुन्हा एकदा नंबर ३ च्या स्थानावर पोहोचायला खूप वेळ लागणार नाही।

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *