Hero Lectro कडून नवीन Electric Cycle लाँच झाले आहेत, काय आहे किंमत आणि रेंज?

Hero Lectro कडून लाँच झाले आहेत नवीन Electric Cycles जे दिसायला सुंदर आणि त्यांच्या किंमती पण अतिशय महाग नाही आहेत। तुम्हाला माहित नसेल तर पूर्वीचा काळात हिरोच्या सायकलीचा खूप दबदबा होता आणि हिरोच्या सायकलींचा बाजारात खूप मागणी होती आणि आज देखील हिरो बदलत्या ट्रेंड प्रमाणे आपल्या सायकली सुद्धा बदलत आहे। हिरोने बदलत्या काळानुसार आपल्या सायकली सुद्धा बदल्या आहेत म्हणजेच आपल्या सायकली सुद्धा आता इलेक्ट्रिक बॅटरी यांच्यावर चालू केल्या आहेत।

जसा जसा लोकांचा कल हा इलेक्ट्रिक वाहनांकडे वळत आहे तसा तसा ऑटोमोबाईल कंपन्या देखील आपला कल हा इलेक्ट्रिक वाहनांकडे वळवत आहेत। नवीन आलेल्या EV Cars ने सुद्धा ग्राहकांमध्ये उत्सुकता निर्माण केली आहे। तर मग चला जाणून घेऊयात कोण कोणत्या नवीन सायकली हिरोने बाजारात आणल्या आहेत।

Hero Lectro Electric Cycle

Hero Lectro ही हिरोची Electric Cycle चा एक विभाग आहे या कंपनी मध्ये फक्त इलेक्ट्रिक सायकलची निर्मिती होते आणि नव नवीन इलेक्ट्रिक सायकली तयार केल्या जातात। ग्राहकांच्या गरजेनुसार उत्पादने डिझाइन करणे, पर्यावणास अनुकूल असे इलेक्ट्रिक सायकल बनवणे आणि लोकांना तंदुरुस्त राहण्यासाठी त्यांचा एक छोटासा प्रयास असे कंपनी कडून सांगण्यात येत आहे।

Hero Lectro H3

H3 हे मॉडेल सुरवातीचे मॉडेल आहे आणि ह्याची तासी २४ किलोमीटर धावण्याची क्षमता आहे। ही सायकल जवळ जवळ च्या ठिकाणी जा येणे करण्यास चांगला पर्याय ठारु शकते।

किंमत

H3 ह्या मॉडेलची किंमत २४,४९९ रुपये इतकी आहे।

रेंज

ह्या H3 इलेक्ट्रिक सायकलची रेंज एका सिंगल चार्जवर ३० किलोमीटर इतकी आहे आणि ह्याची बॅटरी चार्ज करण्यासाठी ३ ते ४ तास लागतात।

Hero Lectro H5

H5 वैशिष्ट्ये सुद्धा वरील दिलेल्या H3 सारखे आहेत पण ह्यामध्ये MTB फ्रेम दिल्यामुळे ह्याची मजबूती वाढली आहे आणि ह्याची २५ किलोमीटर प्रति तास इतका वेग आहे।

किंमत

H5 ह्या मॉडेलची किंमत २५,९९९ रुपये इतकी आहे।

रेंज

H5 ह्या सायकलची रेंज ३० किलोमीटर इतकी आहे आणि ही सायकल एका सिंगल पूर्ण चार्ज मध्ये एवढी ३० किलोमीटर धावू शकते। हिच्या बॅटरीला पूर्ण चार्ज होण्यासाठी ३ ते ४ तास वेळ लागतो।

Hero Lectro C6e

C6e ह्या सायकलचा वेग २५ किलोमीटर प्रति तासाला इतका आहे आणि शहरामध्ये फिरायला खूप चांगली सायकल आहे।

किंमत

C6e ह्या मॉडेलची किंमत २८,४९९ रुपये इतकी आहे।

रेंज

C6e ह्या सायकलची रेंज ३० किलोमीटर इतकी आहे आणि ही सायकल एका सिंगल पूर्ण चार्ज मध्ये ३० किलोमीटर एवढी धावू शकते। हिच्या बॅटरीला पूर्ण चार्ज होण्यासाठी ३ ते ४ तास वेळ लागतो।

Hero Lectro C4+

C4+ ह्या सायकलमध्ये सुद्धा २५ किलोमीटर प्रति तास धावण्याची क्षमता आहे व ही छोट्या ट्रिप घेण्यासाठी उत्तम आहे।

किंमत

C4+ ह्या मॉडेलची किंमत ३०,९९९ रुपये इतकी आहे।

रेंज

C4+ ह्या सायकलची रेंज ३० किलोमीटर इतकी आहे आणि ही सायकल एका सिंगल पूर्ण चार्ज मध्ये ३० किलोमीटर एवढी धावू शकते। हिच्या बॅटरीला पूर्ण चार्ज होण्यासाठी ३ ते ४ तास वेळ लागतो।

Hero Lectro C7+

C7+ ह्या सायकलची खासियत अशी आहे की याला ७ गियर दिले आहेत आणि ह्याची स्पीड सुद्धा २५ किलोमीटर प्रति तास इतकी आहे।

किंमत

C7+ ह्या मॉडेलची किंमत ३४,९९९ रुपये इतकी आहे।

रेंज

C7+ ह्या सायकलची रेंज सर्वात जास्त ३५ किलोमीटर इतकी आहे आणि ही सायकल एका सिंगल पूर्ण चार्ज मध्ये ३५ किलोमीटर एवढी धावू शकते। हिच्या बॅटरीला पूर्ण चार्ज होण्यासाठी ४ तास वेळ लागतो।

ह्या सर्व Electric Cycle LED Screen सह येतात जेणेकरून तुम्हाला बॅटरी किती राहिली आहे बगता येईल। तुमची बॅटरी संपली तर तुम्ही पेडल वापरून सायकल चालवू शकता। ह्यांची मोटर 250W ची आहे आणि तुम्हाला सायकल सोबत चार्जर सुद्धा दिला जातो। C7+ मध्ये वेगवेगळे ७ गियर येतात त्यामुळे तुम्हाला एक अनोखा प्रवास करता यईल। ह्या सर्व Electric Cycle ऑनलाईन ऑर्डर करता येतात।

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *