iPhone धारकांनो सावधान! ‘मर्सनरी’ स्पायवेअरच्या हल्ल्याचा इशारा

अ‍ॅपलने भारतासह 91 इतर देशांमधील iPhone वापरकर्तांना अत्याधुनिक ‘मर्सनरी’ स्पायवेअरच्या (Spyware) हल्ल्याविषयी सतर्क केले आहे. या हल्ल्यांमुळे तुमच्या फोनमधील संवेदनशील माहिती गळतीचा धोका असल्याचे अ‍ॅपलने म्हटले आहे. या स्पायवेअर हल्ल्यांमध्ये हल्लेखोर तुमच्या फोनमध्ये घुसखोर सॉफ्टवेअर इंस्टॉल करण्याचा प्रयत्न करतात. यामुळे तुमच्या कॉल, मेसेज, फोटो, व्हिडीओ आणि इतर डाटा (Data) त्यांना सहजतेने access मिळू शकतो. ही खास वैशिष्ट्य असलेल्या व्यक्तींना (Journalists, Activists) टार्गेट करून केली जाणारी अत्यंत गंभीर गुन्हेगारी कृती आहे.

अ‍ॅपल कडून सूचना

या हल्ल्यांपासून वाचण्यासाठी iPhone वापरकर्तांना दोन महत्वाच्या सूचना दिल्या आहेत.

  • लॉकडाऊन मोड सक्रिय करा : हा मोड तुमच्या फोनच्या काही फीचर्स ब्लॉक करतो पण त्याचबरोबर बाहेरून येणारे संभाव्य धोकेही रोखतो.
  • तुमचा iPhone अपडेट करा : अ‍ॅपल iphone ची सुरक्षा वाडवण्यासाठी सतत iOS अपडेट्स प्रकाशित करतो. तुमच्या फोनवर नवीनतम iOS असल्याची खात्री करा.

काय करू नये?

या बातमीमुळे घाबरण्याची गरज नाही. सध्या हा फार मोठा धोका नसला तरी सतर्क राहणे आवश्यक आहे. अ‍ॅपलने दिलेल्या सूचनांचे पालन केल्याने तुम्ही तुमच्या फोनची सुरक्षा वाढवू शकता. संशयास्पद लिंक्सवर क्लिक करू नये किंवा अविश्वसनीय सोर्स (Source) मधून Apps डाउनलोड करू नये यांचीही काळजी घ्या.

अ‍ॅपलच्या धोका सूचनांबद्दल अधिक माहितीसाठी तुम्ही अ‍ॅपलच्या सपोर्ट पेजला भेट देऊ शकता. तुमच्या फोनची सुरक्षा महत्वाची आहे. तेव्हा या सूचना गांभीर्याने घ्या आणि योग्य ती पावले उचला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *