Kinetic E-Luna: जाणून घ्या किंमत, रेंज, बॅटरी आणि स्पीड

Kinetic कंपनीने आपली स्वतःची इलेक्ट्रिक बाईक Kinetic E-Luna ह्या नावाने बाजारात आणली आहे। Kinetic ने आपली लोकप्रिय आणि सर्वांना परवडणारी लुना गाडी बाजारात इलेक्ट्रिक स्वरूपात आणली आहे। काय आहे गाडीची किंमत, रेंज, बॅटरी पॉवर आणि टॉप स्पीड चला जाणून घेऊयात।

Kinetic E-Luna ची सुरुवात कशी झाली ?

एच.के. फिरोदिया यांनी १९७२ मध्ये कायनेटिक इंजिनीरिंग लिमिटेड ह्या कंपनीची स्थापना केली होती। आज ही एक ऑटोमोटिव्ह पार्ट्सची निर्मिती करते, जी पूर्वी कायनेटिक होंडा आणि नंतर कायनेटिक मोटर्स या ब्रँड नावाखाली दुचाकी विकत होती। मग त्यानंतर कायनेटिक ने लुना मोपेड सादर केली जी देशांतर्गत चांगली विकली गेली आणि अर्जेंटिना, ब्राझील, श्रीलंका आणि युनायटेड स्टेट्समध्ये मोठ्या प्रमाणावर निर्यात केली गेली। कायनेटिक मोटर्सने नव्याने लाँच केलेल्या कायनेटिक ग्रीन ब्रँड अंतर्गत इलेक्ट्रिक वाहनांचे उत्पादन करण्याची योजना जाहीर केली त्यात ई-लुना नावाची लुनाची नवीन आवृत्ती फेब्रुवारी २०२४ मध्ये लाँच केली आहे।

किंमत किती आहे ?

e-luna x1
E-Luna

Kinetic E-Luna, ही दोन वेगवगळ्या प्रकारांमध्ये येणार आहे, E-luna X1 आणि E-luna X2, ह्या दोनी गाड्या जुन्या लुना प्रमाणे आहेत। E-luna X1 याची किंमत ६९,९९० हजार रुपये इतकी आहे आणि E-luna X2 Ex-Showroom किंमत ७४,९९० हजार रुपये इतक्या मध्ये उपलब्ध आहे। हे किनेटिक ई-लुना एक विशिष्ट डिझाइन, नवीनतम फीचर्स आणि एक इलेक्ट्रिक पॉवर समाविष्ट केलेलं आहे आणि का लुना इतकी लोकप्रिय आहे हे दाखवते। लुना ह्या गाडीच्या जास्त किंमती नसल्यामुळे आणि त्यांच्या गाडीच्या अवरेज मुळे ह्या गाड्या लोकप्रिय आहेत।

रेंज किती आहे ?

E-Luna X1 एका सिंगल चार्ज मध्ये ९० किलोमीटर पर्यंत धावू शकते आणि E-Luna X2 एका सिंगल चार्ज मध्ये ११० किलोमीटर पर्यंत धावू शकते अशी माहिती लुना कंपनी कडून देण्यात आली आहे। तुम्हाला जवळच्या जवळ फिरण्यासाठी ही लुनाची गाडी चांगला पर्याय ठरू शकते आणि पर्यावण राखण्यात सुद्धा चांगली मदत करेल।

टॉप स्पीड आणि बॅटरी कशी आहे ?

E-Luna x2
E-luna design

Kinetic E-Luna X1 मध्ये ५० किलोमीटर प्रति तास ह्या वेगाने धावण्याची गति आहे आणि त्याची १.७ किलोवॉअटची बॅटरी क्षमता आहे आणि चार्जिंग करण्यासाठी ह्या बॅटरीला ३ तासांचा वेळ लागतो। Kinetic E-Luna X2 मध्ये गति ५० किलोमीटर प्रति तासची आहे, त्याची बॅटरीची क्षमता २ किलोवॉअट इतकी आहे आणि हिला चार्जिंग करण्यासाठी ४ तासांचा वेळ लागतो।

अखेरीस, किनेटिक ई-लुना ही एक उत्कृष्ट इलेक्ट्रिक टू-व्हीलर आहे, ज्याने लोकांना परवडणारी गाडी आणि पर्यावरणाच्या दृष्टीने सुद्धा एक चांगला पर्याय आहे। या इलेक्ट्रिक वाहनांमुळे पेट्रोल आणि डीझलचं प्रचंड उपयोग कमी केला आहे, हे एक महत्त्वाची बाब आहे। इ.मोबाइलिटी हे सर्वसामान्य वाहन आणि इतर साधनांपेक्षा पर्यावरणसाठी सहज आणि शक्तिशाली असलेलं विकल्प आहे, ज्यामुळे शहरी वाहतूक आणि प्रवास करणाऱ्या लोकांस सुखाचं आणि आत्मसमर्पण वाटतं। इलेक्ट्रिक वाहनांचा वापर करून, आपल्याला एक पर्यावणासाठी आणि आपल्या येणाऱ्या पिडींसाठी उत्तम आणि अधिक सुरक्षित पर्याय ठरला आहे।

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *