संगीतप्रेमींच्या आनंदाला उभारी देणारी बातमी! सॅमसंगने आज त्यांची नवीन वायरलेस इअरबड्स, Samsung Galaxy buds 2 Pro आणि Buds Fe लाँच केले आहेत। Galaxy AI वैशिष्ट्यांसह, हे इअरबड्स आकर्षक डिझाइन, अप्रतिम ध्वनी आणि स्मार्ट वैशिष्ट्ये घेऊन येणार आहेत।
Table of Contents
Samsung Galaxy buds 2 Pro AI वैशिष्ट्ये:
Galaxy AI ही या इअरबड्सची खरी खासियत आहे। यात ऑटो इन-इअर डिटेक्शन म्हणजेज तुम्ही केंव्हा एअरबड्स घातले आहेत आणि काढले आहेत हे डिटेक्ट होणार आणि त्यानुसार गाणी बंद किंवा चालू राहणार। तुमच्या स्मार्टफोनची बॅटरी किती शिलक राहिली आहे ह्याची सूचना देखील तुम्हाला देणार आणि लाइव्ह ट्रान्सलेशनसारखे अत्याधुनिक वैशिष्ट्ये सुद्धा ह्यात समाविष्ट आहेत।
आकर्षक डिझाइन आणि आरामदायक फिट:
बड्स 2 प्रो स्टायलिश डिझाइन आहे, तर बड्स एफई क्लासिक आणि आरामदायक फिट देतो। दोन्ही एअर बड्स पर्यायांमध्ये चांगले टिकाऊ आहेत आणि ह्या दोनी एअर बड्सना P सर्टिफिकेट मिळाले आहे म्हणजेज हे दोन्ही एअर बड्स पाणी प्रतिरोधक आहेत।
ऑटो नॉईस कॅसिलेशन(ANC) मोड आणि Ambient Awareness Mode
तुम्हाला मुसिकचा पूर्णपणे आनंद घेण्यासाठी बड्स 2 प्रो मध्ये ANC दिलेला आहे ज्याने बाहेरील धामधूम कमी करून ते आपल्याला आपल्या संगीत किंवा कॉलवर लक्ष केंद्रित करण्यास मदत करते। Ambient Awareness Mode म्हणजेज परिवेश जागरूकता मोड ने आपण आपल्या सभोवतिला काय चालू हे जाणून घेण्यासाठी बाहेरील आवाज ऐकण्याची परवानगी देतो।
ऑडिओ ड्रायव्हर्स आणि Dolby Atmos:
दोन्ही इअरबड्स उच्च-गुणवत्त्व असलेल्या ऑडिओ ड्रायव्हर्स सह येतात, जे अतिशय उत्तम प्रतिचा बास आणि स्पष्ट ट्रेबल देऊन आपल्याला प्रीमियम ऐकण्याचा एक सुखद अनुभव देतात। Dolby Atmos मुळे आपल्याला थिएटर मध्ये बसल्या सारखा त्रिमितीय ध्वनी अनुभव प्रदान करते।
बॅटरी आयुष्य आणि चार्जिंग केस:
सॅमसंग बड्स 2 प्रो ८ तासांपर्यंत प्लेबॅक आणि चार्जिंग केससह २० तासांपर्यंत बॅटरी आयुष्य देतो। बड्स एफई ८ तासांपर्यंत प्लेबॅक आणि चार्जिंग केससह ३० तासांपर्यंत बॅटरी आयुष्य देतो।
किंमत आणि उपलब्धता:
सॅमसंग गॅलॅक्सी बड्स 2 प्रो ची किंमत ₹१७,९९९ आहे, तर बड्स एफई ची किंमत ₹९,९९९ आहे। हे दोन्ही इअरबड्स भारता मध्ये कधी उपलब्ध होणार ह्याची तारीख अजून देण्यात आलेली नाही।
तुमच्यासाठी हे इअरबड्स योग्य आहेत का?
- जर तुम्हाला सर्वोत्तम मुसिक, ANC आणि आधुनिक AI वैशिष्ट्ये हवी असतील तर बड्स 2 प्रो तुमच्यासाठी आहेत।
- जर तुम्हाला परवडणाऱ्या किंमतीत चांगली मुसिक क्वॉलिटी आणि लांब टिकणारी बॅटरी हवी असेल तर बड्स एफई तुमच्यासाठी योग्य आहे।