Shivrayancha Chhava box Office Collection: मराठी चित्रपटसृष्टीला गौरवशाली इतिहास आणि वीरश्री राखणारी व्यक्तिरेखा सादर करण्याची परंपरा आहे। याच परंपरेला पुढे चालवत १६ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित झालेल्या “शिवरायांचा छावा” या चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता निर्माण केली आहे। छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या पराक्रमांची कथा सांगणाऱ्या या चित्रपटाने केवळ प्रेक्षकांची मने जिंकली नाही, तर बॉक्स ऑफिसवरही आपली ताकद दाखवली आहे। चला तर जाणून घेऊया “शिवरायांचा छावा” चा बॉक्स ऑफिस कलेक्शन किती झाले आहे आणि प्रेक्षकांचा किती प्रतिसाद मिळाला आहे।
Table of Contents
Shivrayancha Chhava Box Office Collection: बॉक्स ऑफिसवर तूफानी आगमन
- मध्यम बजेट असलेल्या या चित्रपटाने पहिल्याच दिवशी चक्क ०.६ कोटींची कमाई केली।
- दुसऱ्या दिवशी या कमाईत वाढ होऊन ०.९ कोटी झाली।
- विकेंडचा फायदा घेत तिसऱ्या दिवशी हा चित्रपट १.३ कोटी पर्यंत पोहोचला।
- चौथ्या दिवशी थोडी कमी होऊन ०.६ कोटींची कमाई झाली।
- पाचव्या दिवसाचे आकडे अद्याप उपलब्ध नाहीत, पण चित्रपटाची गती पाहता तो चांगलाच असण्याची शक्यता आहे।
एकूण पाच दिवसांत Shivrayancha Chavva box office collection सुमारे ३.५० कोटींची झाली आहे। हे आकडे मराठी चित्रपटसृष्टीच्या सरासरी तुलनेत चांगलेच आहेत आणि चित्रपटाची यशस्वी वाटचाल दर्शवतात।
कलाकार आणि दिग्दर्शक कोण आहेत:
- शिवरायांचा छावा” या चित्रपटाचे दिग्दर्शन दिग्पाल लांजेकर यांनी केले आहे।त्यांनी पूर्वी “फर्जंद”, “फत्तेशिकस्त”, “पावनखिंड” आणि “शेर शिवराज” सारख्या यशस्वी चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे।
- या चित्रपटात भूषण पाटील, चिन्मय मांडलेकर आणि मृणाल कुलकर्णी हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत। त्यांच्यासोबत राहुल देव, तृप्ती त्रोडमल आणि रवी काळे हे कलाकार महत्त्वपूर्ण भूमिकेत आहेत।
बजेट किती आहे:
- माहिती उपलब्ध नसल्यामुळे चित्रपटाचे अचूक बजेट सांगणे कठीण आहे। मात्र, मीडिया रिपोर्ट्सनुसार हा चित्रपट बनवण्यासाठी जवळपास १० कोटी इतके आहे।
प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद:
बॉक्स ऑफिस कलेक्शनसोबतच “शिवरायांचा छावा” प्रेक्षकांच्या चांगल्या प्रतिसादाचीही कमाई करत आहे। सोशल मीडियावर प्रेक्षकांचे सकारात्मक रिव्ह्यु पाहायला मिळत आहेत। दिग्दर्शन, कलाकारांची अभिनय, कथानक आणि व्हीएफएक्स यांची विशेष स्तुती होत आहे।
आगामी काळात “शिवरायांचा छावा” ह्या चित्रपटाच्या कमाईत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे।