इलेक्ट्रिक स्पोर्ट्स बाइक मध्ये अल्ट्राविओलेट F77 Mach 2 ने मारली एंट्री

बेंगलुरुस्थित अत्याधुनिक इलेक्ट्रिक वाहन निर्माती कंपनी अल्ट्राविओलेट ने भारतात F77 Mach 2 ही धमाकेदार इलेक्ट्रिक स्पोर्ट्स बाइक लाँच केली आहे. ही बाइक भारतीय रस्त्यांवर वेगाचा आणि रोमांचक अनुभव देण्याची गॅरंटी देते.

F77 Mach 2 मध्ये 30.2 kW ची इलेक्ट्रिक मोटर आहे जी 100 Nm पेक्षा जास्त टॉर्क देते. यामुळे ही बाइक केवळ 3.5 सेकंदात 0 ते 100 किलोमीटर प्रति तास वेग गाठू शकते. तसेच, बाइकची कमाल गती 200 किलोमीटर प्रति तास आहे. ही बाइक आकर्षक आणि Aerodynamic डिझाईनसह येते. एलईडी हेडलाइट्स, स्पोर्टी लूक आणि आरामद सीटिंग पोजिशनमुळे ही बाइक एक वेगळाच अनुभव देते.

F77 Mach 2 मध्ये ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी, राइड टेलीमेट्री, जीपीएस नेव्हिगेशन आणि App इंटिग्रेशनसारखे अत्याधुनिक स्मार्ट फीचर्स आहेत. यामुळे तुमच्या स्मार्टफोनद्वारे बाइकची माहिती मिळवणे आणि नियंत्रण करणे सोपे होते. ही बाइक सिंगल चार्जवर 307 किलोमीटरपर्यंतची रेंज देते. DC फास्ट चार्जर वापरून केवळ 50 मिनिटांत बॅटरी 0 ते 100 टक्क्यांपर्यंत चार्ज केली जाऊ शकते.

F77 Mach 2 ची किंमत ₹2.99 लाख (एक्स-शोरूम) आहे. ही बाइक तीन आकर्षक रंगांमध्ये उपलब्ध आहे – रेड वेक्स (Red Wax), ग्राफाईट (Graphite) आणि लेझर ब्लू (Laser Blue). भारतीय इलेक्ट्रिक वाहनांच्या क्षेत्रात ही एक मोठी भर घालणारी आहे. F77 Mach 2 लाँचमुळे इलेक्ट्रिक स्पोर्ट्स बाइक्सची आवड असलेल्यांसाठी एक उत्तम पर्याय उपलब्ध झाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *