नायिका क्रिती सॅनन यांनी नुकत्याच केलेल्या विधानानं बॉलीवूडमध्ये खळबळ उडवून दिली आहे. त्यांनी चित्रपटांमध्ये पुरुष आणि महिला कलाकारांच्या मानधनातील मोठ्या दरीवर प्रकाश टाकला असून या विषयावर चर्चा सुरू केली आहे. मिमी आणि लुका चुप्पीसारख्या यशस्वी चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणाऱ्या क्रिती सॅनन यांनी नुकत्याच एका मुलाखतीमध्ये ही धक्कादायक माहिती दिली. त्या म्हणाल्या, “एखाद्या चित्रपटासाठी काही पुरुष सह-कलाकार वर्षानुवर्षे फ्लॉप चित्रपट देत असतात तरी त्यांना माझ्यासारख्या यशस्वी अभिनेत्रीपेक्षा 10 पट जास्त मानधन मिळते. हा कसला न्याय आहे?”
निर्मात्यांकडून या पेड गॅपवर जे कारण दिले जाते ते म्हणजे पुरुषकेंद्रीत चित्रपटांना प्रदर्शनापूर्वी अधिक उत्पन्न मिळण्याची शक्यता असते. यामुळे त्या चित्रपटांतील मुख्य अभिनेत्यांना जास्त मानधन दिले जाते. परंतु, सध्या चित्रपटसृष्टीत महिला-केंद्रित चित्रपटांना देखील चांगले बॉक्स ऑफिस कलेक्शन मिळत असल्याचे दिसून येते.
क्रिती सॅनन यांनी त्यांचा “क्रू” या महिला-केंद्रित चित्रपटाच्या उदाहरणाचा दाखला दिला. या चित्रपटाला पुरुष-केंद्रित चित्रपटां इतका बजेट न मिळाल्याची खंत व्यक्त केली. यामुळे अशा चित्रपटांची निर्मिती आणि गुणवत्ता प्रभावित होते.
कृती सनोन यांच्या या विधानामुळे बॉलीवूडमधील लिंगभेदावर चर्चा सुरू झाली आहे. यामुळे चित्रपटसृष्टीत अभिनेत्रींच्या योगदानाची ओळख होईल आणि त्यांना योग्य मानधन मिळेल या अपेक्षा आहे. तसेच, पुरुष आणि महिला कलाकारांना समान संधी आणि मानधन मिळवून देणारी व्यवस्था निर्माण होण्याची गरज यामुळे अधोरेखित होते.